Sindhudurg News : कपडे वाळत घातलाना शॉक लागून महिलेचा मृत्यू! सिंधुदुर्गातील घटनेने हळहळ

Sindhudurg Electric Shock : शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Sindhudurg News : कपडे वाळत घातलाना शॉक लागून महिलेचा मृत्यू! सिंधुदुर्गातील घटनेने हळहळ
दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 2:29 PM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (Sindhudurg News) जिल्ह्यात कपडे वाळत घालत असते वेळी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू (Electric Sh0ck) झाला. ही महिला कपडे वाळत होती. त्या दरम्यान महिलेचा स्पर्श विजेच्या तारांना झाला. यावेळी विजेचा जोरदार धक्का बसून महिलेचा जीव (Tragedy News) गेला. या नंतर जमिनीवर कोसळलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथे या महिलेला डॉक्टरांनी आधीच मृत घोषित केली. सिंधदुर्ग जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. तर मृत महिलेच्या कुटुंबीयांवर दुरःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पावसात विजेच्या तारांपासून खबरदारी बाळगण्याचं आवाहन यानिमित्तानं पुन्हा केलं जातंय. तसंच लोकांनीही सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जातेय. गेल्या काही दिवसांती विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचंही दिसून आलं आहे. राज्यभरात वीज वाहक तारांच्या संपर्कात येऊन, शॉक लागून अनेक निष्पापांजी जीव गेलाय. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यासोबत काळजीही घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्गात नेमकी कुठे घडली घटना?

सिंधुदुर्गात जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात असलेल्या मोर्ले येथे ही दुर्दैवी घटना घडली. मोर्ले गावात राहणाऱ्या शुभांगी सुतार या रात्रीच्या वेळेस कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी त्यांचा शेजारीच असलेल्या वीज वाहक तारांशी संपर्क आला. या वीज वाहक तारांमधून असलेल्या विजेच्या प्रवाहाचा त्यांना जबर धक्का बसला. शॉक लागून शुभांगी सुतार या जागच्या जागी कोसळल्या होत्या.

जमिनीवर कोसळलेल्या शुभांगी यांना घेऊन गावातील लोकं तातीने आरोग्य केंद्राच्या दिशेनं धावले. त्यांनी दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात शुभांगी यांना नेलं. तिथं डॉक्टरांनी तपासताच शुभांगी यांना मृत घोषित केलं. शुभांगी यांच्या मृत्यूबाबत कळल्यानंतर गावातील लोकांना मोठा धक्काच बसला. यानंतर आता संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही काळात शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उल्हासनगरमध्येही एका नऊ वर्षांच्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झालाय. ही घटना ताजी असतानाच आता सिंधुदुर्गातूनही शॉक लागून एका 50 वर्षांच्या महिलेच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय. तर काही दिवसांपूर्वीत औरंगबादेत शॉक लागून दोघा वृद्ध सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. यावेळी दोन बैलही ठार झाले होते. बैलगाडीवरुन परतत असताना बैलांच्या शिंगाला विजेच्या तारा अडकल्या आणि बैल जागी कोसळले. तर बैलगाडीवर स्वार झालेल्या शेतकऱ्याचाही मृत्यू झाला होता. यावेळी भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावाचाही जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जात होती. या वाढत्या घटनांमुळे वीज वाहक तारांपासून खबरदारी बाळगण्याची आणि सतर्क राहण्याची गरजही व्यक्त केली जातेय.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.