Ghaziabad : भाऊ वारला, पण वहिनी रात्री कुणाशी बोलत असते? डोक्यात संशय, दीराने उचललं भयंकर पाऊल

| Updated on: Jul 26, 2022 | 4:30 PM

सदरील घटना ही गाझियाबादमधील लोणी येथील पंचवटी भागात घडली आहे. भावाच्या निधनानंतर असे फोनवर सातत्याने बोलणे चांगले नाही. यासंदर्भात सासरच्या लोकांनी महिलेला समजावूनही सांगितले होते. असे असताना वहिनी रोज कुणाला फोनवर बोलत असतील, त्यांचे कुण्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय दीराला होता.

Ghaziabad : भाऊ वारला, पण वहिनी रात्री कुणाशी बोलत असते? डोक्यात संशय, दीराने उचललं भयंकर पाऊल
संशयातून दीराने वहिनीची हत्या केल्याची घटना गाझियाबाद येथील लोणीमध्ये घडली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई :  (Suspicion) संशयाचा अंगात शिरलं की माणूस कोणत्या स्टेपला जातो याचा प्रत्यय (Ghaziabad) गाझियाबादमधील लोणी येथे आला आहे. शिवाय दिवसेंदिवस त्याच घटना होत राहिल्यास संशय अधिकच बळावतो आणि माणूस मागचा पुढचा कोणताही विचार न करता टोकाची भूमिका घेतो. भाऊ वारल्यानंतरही वहिनी रात्री अज्ञात व्यक्तीशी बोलत असल्याचा संशय घेत दीराने विधवा वहिनीच्या डोक्यात हातोडीने वार करुन तिची (Murder) हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय आपणच हे कृत्य केल्याची कबुलीही मृताच्या दीराने पोलीसांना दिली आहे. वहिनीने फोन बोलल्याले घरातीलच कुणालाच आवडत नव्हते. असे असतानाही दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढल्याने दीराने हे कृत्य केले आहे. सदरील महिलेला तीन मुले असून 11 महिन्यांपूर्वीच रस्ते अपघातामध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला होता.

असा काढला काटा..!

सदरील घटना ही गाझियाबादमधील लोणी येथील पंचवटी भागात घडली आहे. भावाच्या निधनानंतर असे फोनवर सातत्याने बोलणे चांगले नाही. यासंदर्भात सासरच्या लोकांनी महिलेला समजावूनही सांगितले होते. असे असताना वहिनी रोज कुणाला फोनवर बोलत असतील, त्यांचे कुण्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय दीराला होता. यातूनच त्याने दुपारी एकच्या सुमारास आरोपी अभिषेकने वहिनीच्या खोलीमध्ये प्रवेश केला. एवढेच नाहीतर हातोडीने त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केली. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

11 महिन्यापूर्वीच पतीचा मृत्यू, आता मुले पोरकी

आरोपीचा मोठा भाऊ गौरव आणि 23 वर्षीय ट्विंकल यांचे सप्टेंबर 2017 मध्ये लग्न झाले होते. त्यांना तीन मुले आहेत. तर 11 महिन्यापूर्वीच तिच्या पतीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला होता. तेव्हापासून ट्विंकल ही तीन मुलांसह सासरी राहत होती. भावाच्या मृत्यूनंतरच आरोपी अभिषेक हा आपल्या वहिनीकडे संशयाच्या नजरेने बघत होता. त्याच संशयाचा शेवट हा असा झाला आहे. त्याच्या या टोकाच्या निर्णयामुळे तीन मुले आज पोरकी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून आरोपीला अटक

घटनेच्या माहिती मिळताच पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून तपास करण्यास सुरवात केली. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली आहे. चौकशीत आपणच वहिनीचा खुन केल्याचे त्याने कबूल केले आहे, तर त्यामागचे कारणही सांगितले आहे. या घटनेत वापरलेला हातोडाही पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.