पुण्यात कात्रज बोगद्याजवळ विचित्र अपघात, चार वाहनांचा चक्काचूर

पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत चार वाहनांचा चक्काचूर झाल्याची घटना घडली आहे. अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.

पुण्यात कात्रज बोगद्याजवळ विचित्र अपघात, चार वाहनांचा चक्काचूर
कात्रज बोगद्याजवळ अपघातात चार वाहनांचा चक्काचूरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 10:32 AM

पुणे / अभिजीत पोते : भरधाव ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलला धडक दिल्याने घडलेल्या विचित्र अपघातात चार वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. कात्रज बोगद्याजवळ दरी पूल पेट्रोल पंपापासून 100 मीटर अंतरावर हा अपघात घडला. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात वाहने रस्त्यावर पलटी झाली. सीट बेल्ट लावल्याने प्रवासी थोडक्यात बचावले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

ट्रकच्या धडकेत चार वाहनांचा चक्काचूर

पुणे मुंबई महामार्गावर सकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरी पूल पेट्रोल पंपाजवळ मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने पुढे चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की टेम्पो ट्रॅव्हलसह अन्य दोन वाहने या अपघातग्रस्त झाली आणि रस्स्तावर पलटली. या अपघातात चार वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात एकूण सहा जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. सिंहगड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व जखमी सातारा, पुणे, मुंबईतील रहिवासी आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले.

हे सुद्धा वाचा

बाळुमामाच्या भाविकांच्या वाहनाला अपघात

बाळुमामाच्या पालखी तळावर धार्मिक विधी करण्यासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला परतीच्या वेळी अपघात झाल्याची घटना घडली. न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाट येथे पिकअप जीप आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर जोरात धडक झाली. ट्रॅक्टर-पीकअपची जोरात धडक होऊन यात आठ जण जखमी झाले. अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला. जखमींवर शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.