हातात साप घेऊन आली अन् डॉक्टरला म्हणाली, हाच तो… कुठे घडला हा प्रकार?
महोबा जिल्ह्यातील घटेहरा गावातील 52 वर्षीय हरगोविंद यांना सापाने चावल्यानंतर त्यांची पत्नी रामधकेली त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आली. प्राथमिक उपचार गावात झाल्यानंतरही सुधारणा न झाल्याने तिने साप मारून रुग्णालयात आणला. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले आणि आता हरगोविंदची प्रकृती स्थिर आहे.

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा रुग्णालयात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पनवाडी ब्लॉकच्या घटेहरा गावातील एक महिला आपल्या नवऱ्याला उपचार करण्यासाठी रुग्णालयात घेऊन आली होती. पण तिच्या हातात एक मेलेला सापही होता. महिलेच्या हातातील साप पाहून सर्वांच्याच अंगाचा थरकाप उडाला. या महिलेने हा साप थेट डॉक्टरांसमोरच धरला आणि सांगितलं माझ्या नवऱ्याला या सापानेच चावा घेतला. हा साप पाहून नवऱ्यावर उपचार केला. महिलेचं हे म्हणणं ऐकून डॉक्टरही आवाक् झाले.
52 वर्षीय हरगोविंद हे गोठ्यात झोपले होते. पहाटे झोपेतून उठले असता त्याच्या जवळच असलेल्या एक फूट लांब सापाने त्याचा चावा घेतला. सापाने चावा घेतल्याबरोबर हरगोविंद जोरजोरात ओरडायला लागला. आणि त्याने बाजूलाच असलेला दांडका उचलून सापावर जोरदार प्रहार केले. त्याने अनेक प्रहार करत सापाला जागीच मारून टाकलं. त्याची आरडाओरड पाहून त्याची बायको रामधकेली धावतच आली. तिने शेजाऱ्यांना तात्काळ बोलावलं आणि गावात राहणाऱ्या एका गारुड्यालाही बोलावलं. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने उपचार करून हरगोविंदच्या शरीरातून विष काढण्यात आलं. पण त्याची प्रकृती काही सुधारली नाही.
वाचा: काकीचे पुतण्यासोबत प्रेमसंबंध! काकाने कळताच… उचलले खतरनाक पाऊल
गावातच गावठी उपचार
साप चावलेल्या जागी बंधन बांधलं गेलं. पानं बांधल्या गेली. तसेच देशी औषधांचा लेप लावला गेला. त्यामुळे काहीवेळ आराम पडला. पण पूर्ण बरं वाटलं नाही. त्यामुळे रामधकेलीने नवऱ्याला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे नवऱ्यासोबतच मेलेला सापही ती रुग्णालयात घेऊन आली.
रुग्णालयात आल्यावर ती डॉक्टर वरूण यांना भेटली. तिने डॉक्टर वरूण यांना साप दाखला आणि म्हणाली, डॉक्टर साहेब, याच सापाने माझ्या नवऱ्याचा चावा घेतला. आता नवऱ्यावर उपचार करा. हा साप पाहा. तिचं हे म्हणणं ऐकून डॉक्टरही आश्चर्यचकीत जाले. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य पाहून हरगोविंदला तात्काळ एमर्जन्सी वॉर्डात भरती करून उपचार सुरू केले. गारुड्याला बोलावून झाडफूंक करण्यात आली होती. पण फायदा झाला नाही. त्यामुळे हरगोविंदला रुग्णालयात आणण्यात आलं, असं शेजारी राहणारे लक्ष्मीप्रसाद यांनी सांगितलं.
तब्येत सुधारली
आता रुग्णाची प्रकृती सामान्य आहे. पण त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आळं आहे, असं डॉक्टर वरूण म्हणाले. एमर्जन्सी वॉर्डात महिलेचं साप घेऊन येणं आणि डॉक्टरांना साप पाहून उपचार करायला सांगणं हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
