Solapur Crime: सोलापूर जिल्हा हादरला… प्रेम, पैसा, अनैतिक संबंध आणि… काय घडलं?

बीड जिल्ह्यातील युवा व्यावसायिकाने सोलापुरातील बार्शीत गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

Solapur Crime: सोलापूर जिल्हा हादरला… प्रेम, पैसा, अनैतिक संबंध आणि... काय घडलं?
crime
| Updated on: Sep 09, 2025 | 10:18 PM

गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटना सतत वाढताना दिसत आहेत. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील युवा व्यावसायिकाने सोलापुरातील बार्शीत गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातला रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चारचाकी गाडीत आत्महत्या

समोर आलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील सासुरे गावाजवळ एका चारचाकी गाडीत गोविंद बर्गे याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. वैराग येथील पूजा गायकवाड नामक एका नर्तीकेसोबत गोविंद याचे अनैतिक संबंध होते. याच प्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

पूजा गायकवाड विरोधात तक्रार दाखल

गोविंदच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी पूजा गायकवाड हिने गोविंदने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. त्यामुळे आता वैराग पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे शी माहिती बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांनी दिली आहे.

आर्थिक व्यवहारातून वाद

गोविद बर्गे हा रियल इस्टेटचे काम करत होता. याच काळात त्याची ओळख नर्तिका पूजा गायकवाड सोबत झाली. कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यातून आर्थिक व्यवहार झाले. या आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाले होते. हेच वाद सोडवण्यासाठी गोविंद बार्शी तालुक्यातील सासुरे येथे आला होता. मात्र दोघांची भेट झाली की नाही? दोघांमध्ये पुन्हा वाद झाला? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

आत्महत्या की हत्या याचा तपास सरु

आज सासुरे गावानजीक गोंविदचा मृतदेह एका चारचारी गाडीत आढळून आला. आता ही आत्महत्या आहे की हत्या? याबाबत वैराग पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला ताब्यात घेतले आहे. तिची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे हे तपासले जात आहे. यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.