अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते, आईचा मृतदेह 5 दिवस पलंगाखाली लपवला! कळलं कसं?

शेजारी दुर्गंधाने असह्य झाले म्हणून पोलिसांत तक्रार! तपास केला असता भलताच प्रकार समोर

अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते, आईचा मृतदेह 5 दिवस पलंगाखाली लपवला! कळलं कसं?
कानपूरमध्ये मुलाने आईच्या प्रियकराला संपवलेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 1:41 PM

गोरखपूर : एका 45 वर्षीय मुलाने आपल्या आईचा मृतदेह घरातील पलंगाखाली लपवून ठेवला होता. घरातून जेव्हा घाणेरडा वास येऊ लागला, तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी येऊन पाहणी केली असता त्यांना जे दिसलं, ते भयंकर होता. एका वृद्ध महिलेचा मृतदेह पलंगाखाली सडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. मंगळवारी ही घटना उघकसी आली. गोरखपूर जिल्ह्यातील शिवपूर सहबाजगंजमध्ये एका घरात ही धक्कादायक घटना उगडकीस आली. आता हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हा मृतदेह एका निवृत्त शिक्षिकेचा असून तिला एकुलता एक मुलगा आहे. या मुलाने तिचा मृतदेह घरात लपवून ठेवला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आढळून आलेला मृतदेह हा चार ते पाच दिवस जुना असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. ज्या महिलेचा मृतदेह आढळून आला तिचं नाव शांती देवी असून तिचं वय 82 वर्ष होतं. ती निखिल मिश्रा (वय 45) नावाच्या आपल्या एकुलत्या एक मुलासोबत राहत होती.

निखिलची पोलिसांनी चौकशी केली. निखिलला दारुचं व्यसन असून तो मानसिक रुग्ण असल्याचंही बोललं जातंय. त्याच्या चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली असल्याचं पोलिसांनी म्हटलं. पाच दिवस आधीच आईचा मृत्यू झाला, असं निखिलने पोलिसांना सांगितलं. पण आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, असंही तो म्हणाला.

निखिलची पत्नी आणि मुलगाही त्याच घरात राहायला होतं. पण 15 दिवस आधी पत्नी मुलासह माहेरी निघून गेली होती. निखिलचे पत्नीसोबत सतत वाद व्हायचे, अशीही माहिती समोर आली आहे. निखिलने घरात काही भाडेकरु देखील ठेवले होतं. पण निखिलच्या विचित्र व्यवहारामुळे तेही महिन्याभरापूर्वी घर सोडून गेले होते.

आता पोलीस पोस्टमॉर्टेम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत. निखिलच्या आईचा मृत्यू नैसर्गिक होता की नाही, याची शहानिशा पोलिसांना या रिपोर्टमधून करायची आहे. त्यानंतर पोलीस अन्य काही जणांचे जबाब नोंदवून या प्रकरणी पुढील कारवाई करणार असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, आईच्या मृतदेहासोबत तब्बल पाच दिवस राहणाऱ्या या मुलाबाबत चित्र विचित्र प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजलीय.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.