प्रेयसीच्या घरी विद्यार्थी नेत्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप

| Updated on: Apr 04, 2021 | 11:23 AM

उत्तराखंडमधील हल्द्वानी जिल्ह्यात राहणाऱ्या सुंदर आर्य याने 23 मार्चला आत्महत्या केली होती (Sundar Aarya Girlfriend suicide abetment )

प्रेयसीच्या घरी विद्यार्थी नेत्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप
विद्यार्थी नेता सुंदर आर्यची आत्महत्या
Follow us on

देहरादून : विद्यार्थी नेत्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. उत्तराखंडमधील सुंदर आर्य नावाच्या विद्यार्थी नेत्याने काही दिवसांपूर्वी प्रेयसीच्या घरी विष पिऊन आत्महत्या केली होती. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. (Student Leader Sundar Aarya Girlfriend arrested in suicide abetment case in haldwani Uttrakhand)

सुसाईड नोटमध्ये आरोप काय?

उत्तराखंडमधील हल्द्वानी जिल्ह्यात राहणाऱ्या सुंदर आर्य याने 23 मार्चला आत्महत्या केली होती. लामाचौड भागात राहणाऱ्या प्रेयसीच्या घरी जाऊन त्याने विषप्राशन केलं होतं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांवर धमकवण्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप केला होता. प्रेयसीने प्रेमविवाहाचं वचन देऊन नंतर माघार घेतल्याचा आणि अन्यत्र विवाह जमवल्याचा उल्लेखही त्याने सुसाईड नोटमध्ये केला होता.

सुंदर आर्यच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी प्रेयसीसह तिच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शनिवारी मुखानी पोलिसांनी धमकवण्याच्या आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली प्रेयसीला लामाचौड भागातील घरातून अटक केली.

औरंगाबादेत शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रेयसीच्या घरी गळफास

शिवसेनेचे औरंगाबाद उपतालुका प्रमुख आणि दौलताबाद ग्रामपंचायत सदस्य सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेल्या महिन्यात समोर आली होती. मात्र खजिनदार यांच्या कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सुनील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयातून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणला होता.

सुनील खजिनदार यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यासाठी शेकडोंच्या जमावाने दौलताबाद पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. या घटनेमुळे दौलताबादेत तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावातील दुकाने, बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

आत्महत्येमागील कारण काय?

सुनील खजिनदार यांनी दौलताबाद येथील मुजीब कॉलनीतील प्रेयसीच्या घरात 18 मार्चला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील हे एका लोखंडी साखळीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. पोलिसांनी पंचनामा करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली. सुनील यांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेना उपतालुका प्रमुखाचा प्रेयसीच्या घरात गळफास, कुटुंबाला हत्येचा संशय

(Student Leader Sundar Aarya Girlfriend arrested in suicide abetment case in haldwani Uttrakhand)