
पोलिसांनी काल मोठी कारवाई केली आहे. त्यांनी हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांना याबाबत गुप्त सूत्रांनी माहिती दिली होती. त्यांनी थेट हॉटेलवर जाऊन रेड टाकली. त्यामध्ये पोलिसांनी 13 थाई तरुणींना आणि 9 पुरुषांना अटक केली आहे. हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणारे लोक हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून 3500 ते 5000 रुपये वसूल करायचे. थाई महिलांना यामधील केवळ 1500 रुपये मिळाये. हे प्रकरण उघडकीस येताच सर्वांनाच धक्का बसला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सूरत शहरातील जहांगीरपूर परिसरात असणाऱ्या पार्क पवेलियन नावाच्या हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होते. सूरत पोलीसांच्या AHTUला याबाबत माहिती मिळाली होती. जहांगीरलाबाद कॅनल रोड येथील वासू पूज्य इंफ्रा बिल्डींगमध्ये चौथ्या मजल्यावर असलेल्या पार्क पॅवेलियन हॉटेलमध्ये वैश्यवृत्ती सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस हॉटेवर पोहोचले. त्यांनी हॉटेलचा दरवाजा वाजवला. पण आतून कोणीच बाहेर आले नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने दरवाजा तोडला आणि आत शिरले.
वाचा: Google Gemini मध्ये भन्नाट फोटो कसे तयार करायचे? फक्त हे Prompt पेस्ट करा लगेच होईल काम!
दार तोडून आत शिरल्यानंतर पोलिसांना एक हॉल दिसला. तेथे एक काउंटर टेबल ठेवण्यात आला होता आणि काही खूर्च्या. आतमध्ये खोली क्रमांक 403मध्ये सात लोक उपस्थित होते. पोलिसांनी रुपेश उर्फ रुपेश मिश्रा नावाच्या व्यक्तीची चौकशी केली. तो तेथे मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याने मान्य केले की तो ग्राहकांकडून पैसा घ्यायचा आणि परदेशी महिलांसोबत शारीरिक संबंध तयार करण्यासाठी पाठवायचा. तसेच राहुल सोलंकी आणि संजय हिंगडे हे दोघे हाउसकिपिंगचे काम करायचे. तसेच बंटी बाबरिया हा मॅनेजर म्हणून काम करायचा.
चौकशीदरम्यान समोर आले की रुपेश मिश्राने पोलिसांना सांगितले हे संपूर्ण रॅकेट विजय मोहन कस्तरे चालवायचा. तोच या हॉटेलचे भाडे आणि काम करणाऱ्या लोकांना पगार द्यायचा. हे रॅकेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चालायचे. ते ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे घ्यायचा. हे पैसे दिलीपभाई ताळेकर नावाच्या व्यक्तीच्या बँक अकाऊंटमध्ये जमा व्हायचे. तसेच अशोक मामा नावाचा ड्रायवर या महिलांना सोडण्याचे आणि आणायचे काम करयाचा.
महिलांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणात 13 महिलांना अटक केली आहे. त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, 1956 च्या कलम 3, 4, 5, 7 आणि भारतीय दंड संहिता, 2023 च्या कलम 144(2) आणि 54 अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.