
चेन्नई : दोघी शालेय जीवनापासूनच्या खूप चांगल्या मैत्रिणी. पण पुढे जाऊन एकीचा दुसरीवर जीव जडला. त्यातून लिंग बदल शस्त्रक्रिया करुन घेतली. पण या सगळ्याचा खूप धक्कादायक, मन सून्न करणारा शेवट झाला. आपल्याच मैत्रिणीला 26 व्या वाढदिवशी संपवलं. चेन्नई जवळ थालांबूरमध्ये ही दुर्देवी घटना घडली. चेन्नई पोलिसांनी या प्रकरणी वेत्रीमारनला अटक केली आहे. वेत्रीमारन MBA पदवीधर आहे. लिंग बदल शस्त्रक्रिया करण्याआधी वेत्रीमारनच नाव पंडी मुरुगेश्वरी होतं. पोलिसांनी ही माहिती दिली. वेत्रीमारनने आर.नंदिनीची हत्या केली. वेत्रीमारनने स्वत:ची लिंग बदल शस्त्रक्रिया करुन घेतली. नंदिनी आणि मुरुगेश्वरी दोघी मदुराईच्या गर्ल्स स्कूलमध्ये होत्या. परस्परांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.
मुरुगेश्वरीला नंदिनी खूप आवडायची. म्हणून तिने स्वत:ची लिंग बदल शस्त्रक्रिया करुन घेतली. त्यानंतर नंदिनीला मागणी घातली. पण तिने नकार दिला. त्यानंतर दोघे टचमध्ये होते. पोलिसांनी ही माहिती दिली. माहिती-तंत्रज्ञानात बीएससी पदवी घेतल्यानंतर नंदिनीला आठ महिन्यापूर्वी चेन्नईत नोकरी मिळाली. ती तिच्या काकांसोबत राहत होती. शनिवारी वेत्रीमारनने तिला फोन केला व भेटायला बोलावलं. आपल्यासोबत काही वेळ घालवं असं त्याने सांगितलं.
मजा-मस्ती सुरु आहे, असं दाखवून बांधले हात
दोघे भेटले. तो तिच्यासाठी नवीन कपडे घेऊन आला. वेत्रीमारन तिला थालांबूरच्या अनाथालयात घेऊन गेला. तिथे त्यांनी देणगी दिली. वेत्रीमारनन नंदिनीला तुला घरी सोडतो म्हणून सांगितलं. घरी जाताना त्याने एका निर्जनस्थळी गाडी थांबवली. वेत्रीमारनने तिला फोटोसाठी पोज द्यायला सांगितलं. त्याने बाईकरुन चेन आणलेली. त्याने नंदिनीचे हात बांधले. मजा-मस्ती सुरु आहे, असं त्याने सुरुवातीला दाखवलं. नंदिनीने नंतर विनवणी करुनही त्याने तिचे हात सोडले नाहीत. वेत्रीमारनने ब्लेडने तिचा गळा कापला. तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. वेत्रीमारन नंतर तिथून पसार झाला.
नंतर आसपासच्या लोकांनी पोलिसांना बोलावल. पोलिसांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केलं. शनिवारी तिचा मृत्यू झाला. रविवारी पोलिसांनी वेत्रीमारनला पकडलं. वेत्रीमारन शांत आहे. त्याच्या मनात आपल्या कृत्याबद्दल कुठलीही पश्चातापाची भावना नाहीय.