AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईच्या डेंटल कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयानक प्रकार; पँटमध्येच…

नवी मुंबईतील कामोठे येथील एका डेंटल कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चार सिनियर विद्यार्थ्यांवर ज्युनिअरची रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाने या चारही विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.

नवी मुंबईच्या डेंटल कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयानक प्रकार; पँटमध्येच...
नशेंडीकडून दाम्पत्याला मारहाणImage Credit source: tv9
vanita kamble
vanita kamble | Updated on: Sep 12, 2022 | 11:05 PM
Share

पनवेल : कॉलेजमध्ये घडणारे रँगिंगचे(ragging) प्रकार रोखण्यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत. मात्र, असे असताना नवी मुंबईतील एका प्रसिद्ध डेंटल कॉलेजमध्ये( Dental College) रॅगिंग चा भयानक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे एकच उडाली आहे. रँगिंग करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील कामोठे येथील एका डेंटल कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चार सिनियर विद्यार्थ्यांवर ज्युनिअरची रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाने या चारही विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.

कॉलेजनेच याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या चार विद्यार्थ्यांनी एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला दारू पिण्यासाठी भाग पाडले आणि त्याला पँटमध्ये लघवी करण्याचा आग्रह धरला.

ही घटना जुलैमध्ये घडली होती. परंतु पीडित मुलाने आता आपल्यासोबत झालेल्या छळाची माहिती पालकांना दिली. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेला हा पिडित विद्यार्थी कामोठे येथे आपल्या 3 साथीदारांसह राहत होता. याच ठिकाणी दुसऱ्या फ्लॅटवर तीसऱ्या वर्षात शिकत असेलेले विद्यार्थि राहत होते.

हे चार सिनीयर विद्यार्थी आणि त्याच्या साथीदारांना पिडित विद्यार्थ्याला दारू पिण्यास भाग पाडले. यावेळी पीडित तरुणाला लघवीला आली असता रॅगिंग करणाऱ्यांनी त्याला लघवी करण्यापासून रोखले. त्याला अधिक पाणी पिऊन लघवी रोखून धरण्यास सांगितले. त्यानंतर रॅगिंग करणाऱ्यांनी पिडित मुलाला पँटमध्येच लघवी करण्याचा आग्रह धरला.

कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीच्या एका प्राध्यापकाने तक्रार केली. या नंतर कामोठे पोलिसांनी चार विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?