AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझा वाढदिवस आहे, केक कापायचा म्हणत कारमध्ये बसवले अन्… ठाणे कोर्टाच्या आवारातील घटनेने शहर हादरले

ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात नोकरीच्या आमिषाने एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी गुंगीचे औषध देऊन अत्याचार करत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.

माझा वाढदिवस आहे, केक कापायचा म्हणत कारमध्ये बसवले अन्... ठाणे कोर्टाच्या आवारातील घटनेने शहर हादरले
thane crime
| Updated on: Dec 07, 2025 | 1:07 PM
Share

ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये एका विवाहित महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन केला होता. या घटनेच्या तीन महिन्यांनंतर बदनामी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडितेने हिंमत दाखवत अखेर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सोशल मीडियावर कामासंदर्भातील एक जाहिरात पाहिली होती. एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या आशेने तिने त्या नंबरवर संपर्क साधला. आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी तिचा विश्वास संपादन करत तिला ठाण्यातील एका स्पा सेंटरमध्ये नोकरी मिळवून दिली. २५ ऑगस्टला रात्री ८.३० च्या सुमारास आरोपींपैकी एकाने स्पा सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला. त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे, केक कापायचा आहे असे सांगून त्याने पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बोलावले.

यानंतर आरोपींनी ही कार थेट ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारातील एका अंधाऱ्या पार्किंगमध्ये नेली. तिथे केक कापताना त्यांनी त्यामध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. हा केक खाल्ल्यानंतर पीडित महिलेची शुद्ध हरपली. याच संधीचा फायदा घेत गाडीतील दोन्ही आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले.

सातत्याने ब्लॅकमेल करणे सुरु

यानंतर रात्री ११ वाजता आरोपींनी पीडितेला रस्त्यावर सोडून दिले. तसेच याबद्दल कुठेही वाच्यता केलीस तर व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी दिली. यानंतर बदनामीच्या आणि व्हिडीओ व्हायरल होण्याच्या भीतीने पीडितेने तब्बल तीन महिने हे दुःख मनात दाबून ठेवले. मात्र आरोपींनी या व्हिडीओचा आधार घेत तिला सातत्याने ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. मात्र आरोपींचा मानसिक आणि शारीरिक त्रास असह्य झाल्यानंतर अखेर पीडित महिलेने ५ डिसेंबर २०२५ रोजी एका वकील आणि मैत्रिणीच्या मदतीने ठाणे नगर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण आपबिती पोलिसांना सांगितली.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यावेळी पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी हिरालाल केदार याला बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरा आरोपी रवी पवार अद्याप फरार असून पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके त्याचा कसून शोध घेत आहेत. अटक झालेला एक आरोपी युट्युब पत्रकार म्हणून मिरवत होता. न्यायालयाच्या आवारातच अशी गंभीर घटना घडल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर आणि महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....