AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : लोकसभा निवडणूक काळात ठाण्यातील एका मोठ्या मनसे नेत्यावर 5 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप

Crime News : ठाणे जिल्ह्यातील एका मोठ्या मनसे नेत्यावर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना इतका मोठा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Crime News : लोकसभा निवडणूक काळात ठाण्यातील एका मोठ्या मनसे नेत्यावर 5 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप
| Updated on: May 03, 2024 | 7:51 AM
Share

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा नेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा निकटवर्तीय, विश्वासू मानला जातो. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या विरोधात लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका सराफाकडून 5 कोटींची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अविनाश जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत. मुंबईत एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यासोबत ठक्कर नावाचा एक इसमही या प्रकरणात आरोपी आहे. खंडणी मागणे, कट रचणे आणि जीवे मारण्याची धमकी या कलमांखाली त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

अविनाश जाधव हे नेहमी चर्चेत

अविनाश जाधव यांच्यावर कारवाई होऊ शकते. झवेरी बाजारातील एका सोने व्यापाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे. अविनाश जाधव हे नेहमी चर्चेत असतात. मनसेकडून करण्यात येणाऱ्या विविध आंदोलनात ते सक्रीय असतात. जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी नेहमीच आक्रमकपणे उचलून धरले आहेत.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल