Thane Crime : दुसऱ्याचे भांडण सोडवणे जीवावर बेतले, अल्पवयीन मुलांनी तरुणाला भररस्त्यात भोसकले !

दुसऱ्याचे भांडण सोडवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. भांडण सोडवायला गेला आणि जीवाला मुकला.

Thane Crime : दुसऱ्याचे भांडण सोडवणे जीवावर बेतले, अल्पवयीन मुलांनी तरुणाला भररस्त्यात भोसकले !
भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला भोसकले
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 19, 2023 | 10:25 AM

भिवंडी / 19 जुलै 2023 : दुसऱ्याचे भांडण सोडवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. भांडण सोडवायला तरुणाची अल्पवयीन मुलांनी हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. फरहान शेख असे हत्या झालेल्या 26 तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे भिवंडी शहरात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शांतिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

भिवंडी शहरातील गैबीनगर परिसरातील वफा कॉम्प्लेक्सजवळ काही अल्पवयीन मुलांमध्ये काही कारणातून भांडण सुरु होते. यावेळी काही तरुण भांडण सोवण्यासाठी तेथे गेले. यामध्ये फरहान शेखही होता. भांडण मिटवल्यानंतर अल्पवयीन मुलं तिथून निघून गेली. काही वेळाने भांडण करणारी मुलं पुन्हा वफा कॉम्प्लेक्सजवळ आली.

यावेळी फरहान तेथे होता. आरोपींनी फरहानवर चाकूने वार करण्यास सुरवात केली. घाव वर्मी बसल्याने भरपूर रक्तस्त्राव होऊन फरहानचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी तेथून फरार झाले. शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्ह दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर पुढील तपास करत आहेत.