Khopoli : खोपोलीत खड्ड्याचा अंदाज न आल्याने बस पलटी, 20 प्रवासी जखमी

| Updated on: Aug 27, 2022 | 4:09 PM

आज जुन्या रस्त्याने जात असताना खड्डा चुकवण्याच्या नादात एक बस खड्ड्यात गेली. त्यावेळी बसमध्ये एकूण २० प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

Khopoli : खोपोलीत खड्ड्याचा अंदाज न आल्याने बस पलटी, 20 प्रवासी जखमी
Khopoli : खोपोलीत खड्ड्याचा अंदाज न आल्याने बस पलटी, 20 प्रवासी जखमी
Image Credit source: tv9marathi
Follow us on

खोपोली : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर (Pune Mumbai)खंडाळ्याहून खोपोलीकडे (Khopoli) शिंग्रोबा बायपास ने उतरत असताना अवघड वळणावर बस चालकाला (Bus Driver) बस कंट्रोल न झाल्याने बस खड्यात गेल्याने पलटी मारली. ज्यावेळी बसने पलटी मारली त्यावेळी बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. त्यापैकी 15 ते 20 जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णवाहिकेमधून खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीची संस्था आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त बस बाजूला केली आहे. या अपघातामुळे काही काळ घटनास्थळावरील वाहतूक ठप्प झाली होती.

खड्ड्याचा अंदाज न आल्याने बस पलटी मारली

आज जुन्या रस्त्याने जात असताना खड्डा चुकवण्याच्या नादात एक बस खड्ड्यात गेली. त्यावेळी बसमध्ये एकूण २० प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. खड्ड्याचा अंदाज न आल्याने बस पलटी मारली. त्यावेळी अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी हा अपघात झाला. त्यावेळी तिथं वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.

नवीन पुणे मुंबई महामार्गावरती प्रचंड गाड्या असतात

नवीन पुणे मुंबई महामार्गावरती प्रचंड गाड्या असतात. तसेच त्यांचं स्पीड देखील प्रचंड असतं. ज्यांना नव्या रस्त्याने जाणं शक्य नाही अशी लोकं जुन्या रस्त्याचा अधिक वापर करीत आहेत. पुण्यात मागच्या काही दिवसात प्रचंड गाड्याचं ट्रफिक असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या गणपती सणाला गावाला जाणाऱ्या लोकांची वर्दळ अधिक वाढली आहे. नवीन महामार्गावरती अधिक ट्रॅफिक असल्यामुळे अनेकजण जुन्या रस्त्याचा वापर करीत आहेत.