AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar : सरकारी इंजिनिअरच्या घरी सापडले पाच करोड, चक्रावलेल्या अधिकाऱ्यांनी मागवली पैसे मोजण्याची मशिन

संजय कुमार यांच्या दोन पाच कोटी रुपयांची कॅश सापडली आहे. किशनगंज या निवासस्थानी चार कोटी रुपये सापडले. तर पाटणा या निवासस्थानी एक कोटी रुपये सापडले.

Bihar : सरकारी इंजिनिअरच्या घरी सापडले पाच करोड, चक्रावलेल्या अधिकाऱ्यांनी मागवली पैसे मोजण्याची मशिन
सरकारी इंजिनिअरच्या घरी सापडले पाच करोड, चक्रावलेल्या अधिकाऱ्यांनी मागवली पैसे मोजण्याची मशिनImage Credit source: tv9marathi
| Updated on: Aug 27, 2022 | 3:20 PM
Share

नवी दिल्ली : बिहारमध्ये (Bihar), सर्वेलन्स इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे पथक किशन गंजमधील एका कार्यकारी अभियंतांच्या घरी छापेमारी केली. त्यावेळी त्यांना पाच कोटी रुपयांची रोकड मिळाली. संजय कुमार (Sanjay Kumar) असं अभियंत्याचं नाव आहे. ज्यावेळी त्यांच्या घरी छापेमारी सुरु होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यानंतर नोटा मोजण्यात अधिकाऱ्यांना अडचण येत होती. विशेष म्हणजे ज्यावेळी छापेमारी सुरु होती, त्यावेळी कार्यकारी अभियंता (Executive Engineer) यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. संजय कुमार रॉय यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी त्यांच्या सरकारी नोकरीच्या काळात अधिक गडगंज संपत्ती कमावली आहे. सध्या त्यांच्याकडे सापडलेल्या संपत्तीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

अधिकारी चक्रावले, कॅश मोजण्यासाठी मशिन मागविले

सकाळपासून अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी छापेमारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे अजून आणखी किती ठिकाणी त्यांची काळी मालमत्ता आहे. हे सुध्दा उघडकीस येण्याची शक्यता आहे. सकाळपासून त्यांच्या घरी तेरा अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. ज्यावेळी त्यांच्या घरी नोटा सापडल्या त्यावेळी अधिकारी सुध्दा चक्रावून गेले.

दोन ठिकाणी कॅश सापडली

संजय कुमार यांच्या दोन पाच कोटी रुपयांची कॅश सापडली आहे. किशनगंज या निवासस्थानी चार कोटी रुपये सापडले. तर पाटणा या निवासस्थानी एक कोटी रुपये सापडले. संजय कुमार राय ग्रामीण बांधकाम विभागाच्या किशनगंज विभागात कार्यकारी अभियंता म्हणून नोकरी करतात. मात्र, नेमकी किती रक्कम नोटांच्या मोजणीनंतरच समजेल. यासोबतच मोठ्या प्रमाणात दागिने जप्त केल्याचीही चर्चा आहे. जमीन आणि घराची कागदपत्रे मिळण्याची बाबही समोर येत आहे. आत्तापर्यंत पाच ठिकाणी अधिकाऱ्यांनी छापेमारी केली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नेमकी किती मालमत्ता आहे हे कोणीचं सांगू शकणार नाही. सध्या अधिकारी कॅश मशिनच्या साहाय्याने मोजत आहेत. त्यामुळे आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.