मराठमोळ्या सरन्यायाधीशांनी केली धडाकेबाज कामगिरी; चार दिवसांत एवढे खटले निकाली

न्यायालयाने गेल्या 4 दिवसांत 1293 प्रकरणे निकाली काढली आहेत. त्यापैकी 440 बदली प्रकरणे आहेत. गेल्या दोन दिवसांत 106 नियमित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

मराठमोळ्या सरन्यायाधीशांनी केली धडाकेबाज कामगिरी; चार दिवसांत एवढे खटले निकाली
सरन्यायाधीश उदय लळीतImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 1:23 AM

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर उदय लळीत (Uday Lalit) यांच्या रुपात मराठमोळा चेहरा झळकला आणि सर्वोच्च न्यायालयाची कामगिरी सुपरफास्ट (Superfast) झाली आहे. न्यायालयातील वर्षानुवर्षे सुरु असलेली ‘तारीख पे तारीख’ची परंपरा मोडीत काढण्याच्या दिशेने सरन्यायाधीशांनी ठोस पाऊल टाकले आहे. गेल्या चार दिवसांत त्यांनी विक्रमी जवळपास 1300 खटल्यां (Cases)चा निपटारा केला आहे. सर्वोच्च न्यायालय जणू ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ बनल्याने सर्वसामान्य पक्षकारांना वेळीच न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

पदभार स्वीकारतानाच केला होता ‘हा’ निर्धार

नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी निवृत्तीच्या दिवशी तारीख पे तारीखच्या मुद्द्यावर खंत व्यक्त केली होती. तारीख पे तारीखकडे लक्ष देऊ न शकल्याची खंत व्यक्त केली होती. त्यावेळी नवीन सरन्यायाधीश लळीत यांनी प्रलंबित खटल्यांकडे गांभीर्याने लक्ष देणार असल्याचा निर्धार केला होता. त्यानुसार त्यांनी खटले निकाली काढण्याचा चांगलाच धडाका लावला आहे.

गेल्या चार दिवसांत 1293 प्रकरणे निकाली

न्यायालयाने गेल्या 4 दिवसांत 1293 प्रकरणे निकाली काढली आहेत. त्यापैकी 440 बदली प्रकरणे आहेत. गेल्या दोन दिवसांत 106 नियमित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. सरन्यायाधीश लळीत यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

नियमित खटले निकाली काढण्यावर अधिक भर

बार कौन्सिलतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही नियमित खटले निकाली काढण्यावर अधिक भर देत आहोत. न्यायालय खटल्याचा जलद निपटारा करण्याची ही पद्धत सुरू ठेवेल, असे आश्वासन त्यांनी दिले. न्यायालय आता पूर्वीपेक्षा जास्त प्रकरणांचे लिस्टींग करत आहे. अर्थात जास्त खटले सुनावणीसाठी घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोकणचे सुपुत्र उदय लळीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधीश

सरन्यायाधीश उदय लळीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधीश आहेत. ते कोकणातील देवगड तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या नियुक्तीने मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलली आहे. त्यात आता सरन्यायाधीशांच्या धडाकेबाज, विक्रमी कामगिरीने संपूर्ण देशवासीयांना वेळीच न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

लळीत यांचा कार्यकाळ केवळ 74 दिवसांचा

वास्तविक, लळीत यांचा कार्यकाळ फार अल्पकाळाचा म्हणजेच अवघ्या 74 दिवसांचा आहे. अशा परिस्थितीत त्यांना जास्तीत जास्त खटल्यांची सुनावणी कमी वेळेत पूर्ण करायची आहे. त्यांनी गेल्या शनिवारी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. 26 ऑगस्ट रोजी निवृत्त झालेल्या सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. (The Chief Justice of the Supreme Court disposed of so many cases in four days)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.