AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Transgender Escort : ट्रान्सजेंडर एस्कॉर्टनं इंग्लंडच्या दिग्गज फुटबॉलपटूसोबत संबंध ठेवले, त्यानंतर झालं असं काही की…

रिपोर्टनुसार, फुटबॉलपटूने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी जूनमध्ये ट्रान्सजेंडर एस्कॉर्टला ब्लॅकमेलच्या संशयावरुन अटक करण्यात आली होती.

Transgender Escort : ट्रान्सजेंडर एस्कॉर्टनं इंग्लंडच्या दिग्गज फुटबॉलपटूसोबत संबंध ठेवले, त्यानंतर झालं असं काही की...
ट्रान्सजेंडर एस्कॉर्टनं इंग्लंडच्या दिग्गज फुटबॉलपटूसोबत संबंध ठेवलेImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 07, 2022 | 2:11 PM
Share

मुंबई : लॉकडाऊनदरम्यान इंग्लंडच्या (England) एका दिग्गज फुटबॉलपटुला (footballer) ब्लॅकमेलिंगच्या कटाचा सामना करावा लागलाय. एका रिपोर्टनुसार, फुटबॉलपटूचे एका ट्रान्सजेंडर एस्कॉर्टसोबत (Transgender Escort) संबंध होते. फुटबॉलपटूला वाटलं की दोघांच्याही भेटी खासगी राहतील. पण त्या ट्रान्सजेंडरनं व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि ते फुटबॉलपटूला कळूही दिलं नाही. ट्रान्सजेंडरनं फुटबॉलपटूचा त्याच्या घराबाहेर कारमधील फोटोही काढला. इंग्रजी न्यूज वेबसाईट द सनच्या म्हणण्यानुसार, महिलेनं या पुराव्यांचा वापर फुटबॉलपटूकडून पैसे उकळण्यासाठी केला. ट्रान्सजेंडर एस्कॉर्टने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत फुटबॉलपटूकडून तीस हजार पाऊंड म्हणजेच सुमारे 28 लाख 48 गजार रुपये मागितले. या धक्कादायक घटनेची जगभरात चर्चा आहे.

दोघांमध्ये अनेक भेटी

प्रीमियर लीगमध्य सहभागी झालेल्या या स्टारने एका एस्कॉर्टिंग वेबसाईटवर त्या ट्रान्सजेंडर एस्कॉर्टची प्रोफाईल पहिली होती. त्यानंतर फुटबॉलपटूने ट्रान्सजेंडरशी संपर्क साधला. या फुटबॉल खेळाडूने एप्रिल 2021मध्ये ट्रान्सजेंडरशी संबंध ठेवण्यासाठी दीडशे पाऊंड दिले होते. यादरम्यान, दोघेही शहराच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये अनेक वेळा भेटले. त्यांच्यात अनेकदा संबंध ठेवले गेले. मात्र, आपला व्हिडीओ काढला जातोय, अशी फुटबॉलपटूला थोडी देखील कल्पना आली नाही.

पोलिसात तक्रार नोंदवली

रिपोर्टनुसार, इंग्लंडच्या फुटलबॉलपटूने फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. अखेरीस ट्रान्सजेंडरला गेल्या जूनमध्ये ब्लॅकमेलच्या संशयावरुन अटक करण्यात आली आहे. ट्रान्सजेंडर एस्कॉर्टची या नात्याबद्दल चौकशी करण्यात आली. फुटलॉलपटूने त्याचे म्हणने नोंदवले नाही. त्यानंतर प्रकरणाचा तपास थाबवण्यात आला. त्या फुटबॉलपटूच्या क्लबला देखील संपूर्ण परिस्थितीची जाणीव करुन देण्यात आली होती. असंही रिपोर्टमध्ये म्हटलंय. या संपूर्ण घटनेनंतर त्या खेळाडूच्या कमगिरीतही घसरण झाल्याचं बघायला मिळालं. आपलं नाव पुढे येईल आणि चाहत्यांकडून शिवीगाळ होईल याची भीती त्या फुटबॉलपटूला वाटत होतीय.

Follow Us
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
Shiv Sena Symbol : मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह... धनुष्यबाणाच्या वादावर संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा, पुढे म्हणाले...
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...
Eco Friendly Ganeshotsav : DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम काय म्हणाले?
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी
Video : 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले...
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...
Mumbai Coastal Road crash : कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी पण त्याच्या BMW कारचा..
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन