अवघ्या 30 रुपयांसाठी हाणामारी, लाथाबुक्या घातल्या; पुढे जे केले त्याने सर्वच हादरले !

मयत सोनू आणि आरोपी राहुल दोघेही लग्नसमारंभात कॅटरिंगचे काम करत होते. सोनूने राहुलकडून 30 रुपये घेतले होते. ते परत करण्यासाठी अनेक दिवस राहुलने सोनूकडे तगादा लावला होता. मात्र सोनू पैसे देत नव्हता.

अवघ्या 30 रुपयांसाठी हाणामारी, लाथाबुक्या घातल्या; पुढे जे केले त्याने सर्वच हादरले !
काळा रंग पसंत नव्हता म्हणून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: Google
| Updated on: Feb 24, 2023 | 12:41 PM

नवी दिल्ली : उसने घेतलेले 30 रुपये परत करत नव्हता म्हणून दोघा भावांनी मिळून एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी बाबू जगजीवन राम रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी मॉडेल टाऊन पोलीस ठाण्यात पोलीस हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. राहुल आणि हरिश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघे आरोपी सख्खे भाऊ आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि कपडे हस्तगत करण्यात आला आहे. सोनू असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

उसने घेतलेल्या 30 रुपयांवरुन वाद

मयत सोनू आणि आरोपी राहुल दोघेही लग्नसमारंभात कॅटरिंगचे काम करत होते. सोनूने राहुलकडून 30 रुपये घेतले होते. ते परत करण्यासाठी अनेक दिवस राहुलने सोनूकडे तगादा लावला होता. मात्र सोनू पैसे देत नव्हता. काल संध्याकाळी राहुल आपला भाऊ हरिशसह सोनूकडे पैसे मागण्यासाठी गेला होता. सोनूला अद्दल घडवण्यासाठी चाकूही सोबत घेऊन गेला.

पैशांवरुन वाद झाला, मग हाणामारीनंतर हत्या

दोन्ही आरोपी आणि सोनू यांच्यात पुन्हा पैशावरुन वादावादी सुरु झाली. यानंतर वादाचे मारामारीच पर्यावसन झाले. दोन्ही आरोपींनी सोनूला मारहाण करत चाकूने पोटावर अनेक वार केले. सोनू हा विवाहित असून, त्याला चार मुले आहेत. घटनेची माहिती मिळताच मॉडेल टाऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सोनूला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.