डिजेचा धांगडधिंगा जीवावर बेतला, मारहाणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डीजे बंद करण्यावरुन झालेल्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

डिजेचा धांगडधिंगा जीवावर बेतला, मारहाणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
कर्नाटकात रेल्वे स्थानकात महिलेचा मृतदेह आढळला
Image Credit source: Google
| Updated on: Mar 09, 2023 | 5:14 PM

रोहतक : डीजे बंद करायला सांगितला म्हणून टोळक्याने मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हरियाणातील रोहतकमध्ये घडली आहे. तुलाराम असे मयत तरुणाचे नाव आहे. तुलाराम हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून, रोहतकमध्ये बहिणीकडे आला होता. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी 10 ते 12 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय घडले नेमके?

तुलाराम आपल्या बहिणीकडे आला होता. बुधवारी बहिणीच्या घराजवळ जोरजोरात डीजे वाजत होता. यावेळी तुलारामने डीजे संचालकाला डीजे बंद करण्यास सांगितला. यावरुन दोन्ही पक्षात वाद झाला. मात्र हा वाद शांत झाला आणि दोन्ही पक्ष आपापल्या घरी निघून गेले.

धारदार हत्याराने वार करत तरुणाची हत्या

काही वेळानंतर डीजे संचालक काही लोकांना घेऊन सोनीपत रोडवर आला. या ठिकाणी तुलाराम आपला भावोजी आणि एका तरुणासोबत बसला होता. तेथे पुन्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. मग टोकळ्याने तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर तुलारामवर धारदार हत्याराने अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात तुलारामचा मृत्यू झाला.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. ही सर्व तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून, त्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.