AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिनाभरानंतर घरात सनई-चौघडे वाजणार होते, मात्र तत्पूर्वीच नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली, कारण काय?

घरात लगीनघाई सुरु होती. सर्व आनंदात होते. नेहमीप्रमाणे तो रात्री जेवण आटोपल्यावर भावी पत्नीला व्हिडिओ कॉल करायला गेला. मात्र पत्नीशी बोलत असतानाच तरुणाने जे केले त्यानंतर घरच्यांना धक्काच बसला.

महिनाभरानंतर घरात सनई-चौघडे वाजणार होते, मात्र तत्पूर्वीच नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली, कारण काय?
जळगावात अज्ञात कारणातून तरुणाने जीवन संपवलेImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 24, 2023 | 8:30 PM
Share

अनिल केऱ्हाळे, जळगाव : जळगावातील सिंधी कॉलनीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातच खळबळ उडाली आहे. एक तरुण आपल्या भावी पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता. मात्र कॉलवर बोलता बोलता तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आणि आपली जीवनयात्राच संपवली. तरुणाच्या या निर्णयामुळे कुटुंबीयांना धक्काच बसला. त्याने हे कृत्य का केले? याबाबत अद्याप काहीच कळू शकले नाही. भावी पत्नीसोबत बोलता बोलता असं काय घडलं की तरुणाने थेट आयुष्यच संपवलं, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एक महिन्यानंतर तरुणाचे लग्न होणार होते

मयत तरुण हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दोन महिन्यांपूर्वी त्याचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर पुढच्या महिन्यात 22 मे रोजी त्याचा विवाह होणार होता. घरी लगीनघाई सुरु होती. घरामध्ये लग्न असल्यामुळे सर्वच जण आनंदात होते. घरचे लग्नाच्या तयारीत बिझी होते. शनिवारी रात्री जेवून झाल्यावर तो घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला आणि भावी पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता.

भावी पत्नीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना जीवन संपवले

भावी पत्नीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाच त्याने आपले जीवन संपवले. तरुणाच्या आईच्या हा प्रकार लक्षात येताच तिने हंबरडा फोडला. तिचा आवाज ऐकून घरातील इतर सदस्य धावत दुसऱ्या मजल्यावर गेले आणि त्यांनी तरुणाला उचलून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणाच्या पश्चात आई गुड्डी, वडील गौतम दयाराम बागडे, लहान भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?