पुण्यात प्रचंड थरार, एकावेळी चार पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला तिथेच ठोकले, काय घडलं नेमकं?
सातारा शहर पोलिसांवर शिक्रापूरमध्ये हल्ला करण्यात आला होता. मात्र या हल्ला करणाऱ्या आरोपीचा सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. लखन भोसले असे एन्काऊंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सातारा शहर पोलिसांवर शिक्रापूरमध्ये हल्ला करण्यात आला होता. मात्र या हल्ला करणाऱ्या आरोपीचा सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. लखन भोसले असे एन्काऊंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे. एका चोरीच्या प्रकरणात लखन भोसलेला अटक करण्यासाठी चार पोलिस गेले होते. पोलिसांवर त्याने केला हल्ला होता. त्यानंतर आता त्याचा एन्काउंटर करण्यात आला आहे.
आरोपीचा पोलिसांवर हल्ला
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी आहे. लखन वर सातारा जिल्ह्यासह सांगलीत जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील चैन चोरून फरार झालेल्या लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले होते. त्यावेळी लखनने इतर साथीदारांच्या मदतीने पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात सातारा पोलीस दलातील चार पोलीस गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी केला एन्काऊंटर
आरोपीने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दिले आणि आरोपीवर गोळीबार केला. एक गोळी लखन भोसलेच्या कमरेला लागली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर खाजगी रुग्णालयाती उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान लखन भोसलेचा मृत्यू झाला. या चकमकीदरम्यान सखनसोबत असलेले इतर आरोपी पसार झाले आहेत.
या एन्काउंटरची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड हे घटनास्थळी पोहोतली व पाहणी केली. आता याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
