ती गाडी पंक्चर होणं आणि 18 कोटींचं सोनं चोरीला जाणं, योगायोग की खिळे पेरून घातलेला दरोडा? वाचा काय घडलं?

बॅगेत दागिने, कागदपत्रे, लॅपटॉप, पर्स आणि 18 कोटी रुपयांचे क्रेडिट कार्ड होते. याप्रकरणी पोलीस कंपनीतील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करत आहेत.

ती गाडी पंक्चर होणं आणि 18 कोटींचं सोनं चोरीला जाणं, योगायोग की खिळे पेरून घातलेला दरोडा? वाचा काय घडलं?
आंतरराष्ट्रीय ज्वेलरी कंपनीच्या सेल्स हेडच्या वाहनातून सोन्याचे दागिने चोरीलाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 5:29 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील विकासपुरीमध्ये चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका आंतरराष्ट्रीय ज्वेलरी कंपनीच्या सेल्स हेडच्या वाहनातून चोरट्यांनी तब्बल 18 कोटी रुपयांचे दागिने चोरले (Jewellery Stolen) आहेत. कारमधील पंक्चर दुरुस्त (Puncture Repair) करण्यासाठी कंपनीचे सेल्स हेड विकासपुरी पोलिस ठाण्याजवळ थांबले होते. दुरुस्ती दरम्यान चोरट्यांनी कारमध्ये ठेवलेली बॅग (Bag) चोरून नेली. पंक्चर दुरुस्ती करणाऱ्याला पैसे देण्यासाठी अधिकाऱ्याने बॅग पाहिली, तेव्हा कारमध्ये बॅग नव्हती. त्यांनी तत्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळतात तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अधिकाऱ्याच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

मिरारी इंटरनॅशनल कंपनीच्या सेल्स हेडला लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित संजय नाथ हे आपल्या कुटुंबासह विकासपुरी येथे राहतात. नाथ हे मिरारी इंटरनॅशनल कंपनीत सेल्स हेड म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीचे कार्यालय गुरुग्राम येथील उद्योग विहार येथे आहे.

हे सुद्धा वाचा

बंगळुरुत प्रदर्शनासाठी घेऊन चालले होते दागिने

नाथ यांनी सांगितले की, बंगळुरूमध्ये दागिन्यांचे प्रदर्शन होणार होते. त्यासाठी त्यांना दागिने घेऊन बंगळुरूला जायचे होते. यासाठी 2 सप्टेंबर रोजी कार्यालयातून बाहेर पडताना दागिन्यांनी भरलेली बॅग घेऊन ते घरी येत होते. ते त्यांच्या कार्यालयातून विकासपुरीकडे निघाले. यावेळी त्यांच्यासोबत वाहनचालक अशोक, झाकीर आणि नीरज हे दोघेही उपस्थित होते.

बॅगेत दागिन्यांसह इतर साहित्य होते

नाथ यांनी झाकीरला कापशेरा सीमेजवळ आणि नीरजला नवादा मेट्रो स्टेशनजवळ सोडले. ते अशोकला घेऊन त्यांच्या घरी निघाले. यानंतर विकासपुरीत त्याच्यासोबत हा प्रकार घडला. बॅगेत दागिने, कागदपत्रे, लॅपटॉप, पर्स आणि 18 कोटी रुपयांचे क्रेडिट कार्ड होते. याप्रकरणी पोलीस कंपनीतील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करत आहेत. (Thieves stole jewellery worth Rs 18 crore from the vehicle of the sales head of an international jewellery company in delhi)

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....