VIDEO | हिरे दागिन्यांच्या दुकानात नऊ जण शिरले, हातोड्याने काचा फोडून दरोडा

काळे-पांढरे रंगाचे कपडे घातलेली, संपूर्ण चेहरे झाकणारे मास्क घातलेली नऊ जणांची सशस्त्र टोळी कॅलिफोर्नियातील कॉन्कॉर्ड येथील सन व्हॅली मॉलमध्ये असलेल्या हिऱ्याच्या दागिन्यांच्या दुकानात घुसली होती. "

VIDEO | हिरे दागिन्यांच्या दुकानात नऊ जण शिरले, हातोड्याने काचा फोडून दरोडा
कॅलिफोर्नियात दागिन्यांच्या दुकानात लूट
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 8:06 AM

कॅलिफोर्निया : हातोडे घेऊन आलेल्या नऊ जणांच्या सशस्त्र टोळीने अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांचे दुकान लुटल्याची (California jewelry store) घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी कॉन्कॉर्ड (Concord) येथील सन व्हॅली मॉलमध्ये (Sun Valley Mall) असलेल्या या दुकानातील डिस्प्लेची काच फोडून दागिने लुबाडले. हा प्रकार 15 नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

संपूर्ण चेहरे झाकणारे मास्क घालून नऊ जणांची सशस्त्र टोळी कॅलिफोर्नियातील कॉन्कॉर्ड येथील सन व्हॅली मॉलमध्ये असलेल्या हिऱ्याच्या दागिन्यांच्या दुकानात घुसली होती. “ज्वेलरी दुकानातील कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र टोळक्याने त्यांना हातोड्याचा धाक दाखवल्यामुळे त्यांनी माघार घेतली” अशी माहिती कॅलिफोर्नियातील कॉन्कॉर्ड पोलिस विभागाने फेसबुकवर दिली आहे.

गोळीबार नाही, हातोड्याने काचा फोडल्या

“पोलिस येण्यापूर्वीच संशयित पळून गेले. मॉलमधील काही ग्राहकांनी गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचे कळवले, पण प्रत्यक्षात त्यांना काच फोडल्याचा हातोड्याचा आवाज ऐकू आला. एकही गोळी झाडली गेलेली नाही.” असं पोलिसांनी स्पष्ट केलं. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

स्मॅश अँड ग्रॅब लुटीच्या अनेक घटना

ज्वेलर्स सिक्युरिटी अलायन्सने दिलेल्या अहवालानुसार “कॅलिफोर्नियातील मॉलमध्ये 3 ते 7 संशयितांद्वारे हातोड्याने हल्ला करुन दागिने लुटण्याचा (smash and grab robberies) प्रकार घडला आहे.” 20 मे रोजी मिलपिटास, 21 मे रोजी हेवर्ड, 15 सप्टेंबर रोजी डेली सिटी आणि 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी सॅन जोस येथे अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. मात्र स्थानिक पोलिसांना अशा लुटींवर प्रतिबंध घालण्यास यश आलेले दिसत नाही.

संबंधित बातम्या :

इंटर्न महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न, फेसबुक फ्रेण्ड पसार

दोन दिवसांपूर्वी थाटात लग्न, डोळ्यात नवीन संसाराची स्वप्नं, सत्यनारायणाची पूजा आटोपून नवरदेवाची आत्महत्या

फेसबुकवरुन शस्त्रास्त्रे, दारूगोळा विक्री, पोलीसही चक्रावले, जाणून घ्या काय आहे पाकिस्तानी लिंक