झटपट श्रीमंत होण्यासाठी चालत्या रिक्षात महिला प्रवाशांना लुटायचे, अखेर ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात

हे तिघेही चालत्या रिक्षाचा पाठलाग करायचे. गतीरोधकावर वेग कमी होत असल्याची संधी साधत रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची पर्स किंवा दागिने खेचून पळायचे.

झटपट श्रीमंत होण्यासाठी चालत्या रिक्षात महिला प्रवाशांना लुटायचे, अखेर असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
चालत्या रिक्षात महिलांना लुटणाऱ्या आरोपींना अटक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 12, 2023 | 6:30 PM

कल्याण : चालत्या रिक्षातून महिलांची पर्स आणि दागिने लुटून पसार होणाऱ्या तिघांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. संकेत संजय केळकर, जय गोकुळ थोरात आणि अथर्व राजेश वाव्हळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. हे तिन्ही आरोपी उल्हासनगर परिसरात राहणारे आहेत. हे तिघेही चालत्या रिक्षाचा पाठलाग करायचे. गतीरोधकावर वेग कमी होत असल्याची संधी साधत रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची पर्स किंवा दागिने खेचून पळायचे.

असे अडकले जाळ्यात

एक महिला बापगावकडून कल्याण स्टेशनकडे रिक्षाने चालली होती. यावेळी निक्कीनगर चौकाच्या पुढील गतिरोधकावर रिक्षाचा वेग कमी झाल्याची संधी साधत दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी महिलेची पर्स खेचून पोबारा केला.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक

याप्रकरणी सदर महिलेने खडकपाडा पोलिसात तक्रार दिली होती. या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तिघांचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.

झटपट श्रीमंत होण्यासाठी करायचे चैन स्नॅचिंग

झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या तरुणांनी चैन स्नॅचिंगचा मार्ग स्वीकारला. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेली पर्स जप्त केल्याचे खडकपाडा पोलिसांनी सांगितले.

अंबरनाथमध्ये महिलेचं मंगळसूत्र खेचलं

अंबरनाथमधील कानसई परिसरात पायी घरी चालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चोरट्याने पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला.