Accident : ट्रकची दुचाकीला धडक, दोन शिक्षकांचा जागीचं मृत्यू, फरारी ट्रक चालकाचा पोलिसांकडून शोध

अपघात झाल्याची माहिती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्याचं मोठ्या रांगा लागल्या होत्या.

Accident : ट्रकची दुचाकीला धडक, दोन शिक्षकांचा जागीचं मृत्यू, फरारी ट्रक चालकाचा पोलिसांकडून शोध
pabhani crime newsImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 10:54 AM

परभणी : परभणीच्या (Parbhani Crime News) मानवत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कल्याण-निर्मल रस्त्यावर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात (bike Truck Accident) झाला आहे. अपघातात दुचाकीवरील दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू (Two Teacher Death) झाल्याची माहिती मिळाली आहे. रामेश्वर कदम, गंगाधर राऊळ असं मृत शिक्षकांची नाव आहेत. शाळेकडे येत असताना पाथरीहुन परभणीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. यात दोघाही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झाल्यानंतर ट्रकचालक जागेवरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे. पोलिस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. ट्रक चालकाल ताब्यात घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्यामुळे…

महाराष्ट्रात रोज अपघाताच्या घटना घडतात, परंतु दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या डोळ्यात सुध्दा अश्रू होते. दोन्ही शिक्षकांचे मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहेत.शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलिस ट्रकच्या चालकाचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती…

अपघात झाल्याची माहिती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्याचं मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घटनास्थळावरील वाहनं हटवण्यात आली. त्याबरोबर गर्दी सुद्धा पांगवली असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अपघात झाल्यानंतर मोठी गर्दी झाली होती. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.