Tv9 Marathi Special : सिद्धू मुसेवाला हत्येचं पुणे कनेक्शन! चाहते बनत रेकी, पुण्यातील दोघांसह 4 राज्यातील 8 शूटर्सनी केली मुसेवालाच्या शरिराची चाळणी

| Updated on: Jun 07, 2022 | 3:09 PM

मुसेवाला हत्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय. पंजाब पोलिसांनी 8 शार्प शूटर्सची ओळख पटवली आहे. यात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे मुसेवाला हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन आता समोर आलंय! 8 शार्प शूटर्सपैकी दोघे पुण्याचे असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.

Tv9 Marathi Special : सिद्धू मुसेवाला हत्येचं पुणे कनेक्शन! चाहते बनत रेकी, पुण्यातील दोघांसह 4 राज्यातील 8 शूटर्सनी केली मुसेवालाच्या शरिराची चाळणी
सिद्धू मुसेवाला हत्येचं पुणे कनेक्शन
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose wala) हत्येनं संपूर्ण देशात खळबळ माजली. Gangs of Wasseypur सिनेमा असो वा मराठीतील मुळशी पॅटर्न असो, या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या टोळी युद्धाचा मुसेवाला बळी ठरला. मुसेवालावर हल्ला झाला तेव्हा हल्लेखोरांनी त्याच्या शरिराची अक्षरश: चाळण केली होती. मुसेवालाच्या शरिरावर तब्बल 23 जखमा आढळून आल्या! आता मुसेवाला हत्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) 8 शार्प शूटर्सची ओळख पटवली आहे. यात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे मुसेवाला हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन (Pune Connection) आता समोर आलंय! 8 शार्प शूटर्सपैकी दोघे पुण्याचे असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.

पंजाब पोलिसांनी मानसामधून केकडा नावाच्या एका आरोपीला अटक केलीय. केकडानेच चाहता बनत मुसेवालाची रेकी केली होती. यानेच शार्प शूटर्सना मुसेवालाच्या हालचालीची माहिती दिली होती, असा दावा पोलिसांनी केलीय. दरम्यान, शार्प शूटर्सची ओळख पटल्यानंतर आता चारही राज्यांचे पोलीस कामाला लागले आहेत. पंजाब पोलिसांचे अधिकारी आज सकाळीच पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातून दोन शार्प शूटर्सना मुसेवालाच्या हत्येसाठी बोलावण्यात आलं होतं. त्या दोघांची नावं आणि फोटोही पोलिसांनी उघड केले आहेत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी त्यांची नावं आहेत.

चाहता बनत मुसेवालाची रेकी!

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केकडा नावाच्या आरोपीने मुसेवालाचा चाहता बनत त्याची रेकी केली होती. तो सिरसाच्या कालियावालीचा रहिवासी आहे. तो आपल्या एका मित्रासह मुसेवालाच्या घरी त्याचा चाहता बनून गेला होता. त्याने तिथे चहा घेतला आणि मुसेवालासोबत सेल्फीही घेतली. केकडाने शार्प शूटर्सना मुसेवाला थार जीपमधून जात असल्याची माहिती दिली. तो आपले अंगरक्षक आणि बुलेट फ्रुफ गाडी घेऊन गेला नाही, असंही त्याने शार्प शूटर्सना सांगितलं. त्यानंतर थोड्या अंतरावर पोहोचताच मुसेवालाची हत्या करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

4 राज्यातील 8 शार्प शूटर्स

मूसेवालाच्या हत्या प्रकरणात पंजाबमधील जगरुप सिंह रुपा आणि मनप्रीत मन्नू, हरियाणाच्या सोनीपतचा प्रियवर्त फौजी आणि मनप्रीत भोलू, महाराष्ट्राच्या पुण्यातील संतोष जाधव आणि सौरव महाकाल, राजस्थानच्या सीकरचा सुभाष बानूडा आणि पंजाबच्या भटिंडामधील हरकमल सिंह रानू या शार्प शूटर्सचा समावेश असल्याची माहिती पंजाब पोलिसांकडून देण्यात आलीय.

मुसेवालाच्या हत्येपूर्वी 3 दिवस आधी हे सर्व आरोपी कोटकपुरा हायवेवर एकत्र आले होते. त्यानंतर ते कुठे गेले, कुठे थांबले याचा तपास पोलीस करत आहेत. या हत्याकांडात 8 शार्प शूटर्ससह अजून दोन लोकांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

हत्याकांडाचा मास्टरमाईंड सचिन बिष्णोई

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड सचिन बिष्णोई असल्याचा पंजाब पोलिसांचा दावा आहे. मुसेवालाच्या हत्येचा संपूर्ण कट सचिन बिष्णोईनेच रचला. त्यानेच शार्प शूटर हायर केले आणि मुसेवालाची हत्या घडवून आणली, असं पोलिसांचं म्हणणं आहे. सचिन बिष्णोई हा तिहार जेलमध्ये बंद असलेल्या लॉरेन्सचा भाचा आहे. त्याने एका टीव्ही चॅनेलला फोन करुन हत्येची कबुली दिली होती. मी स्वत: मुसेवालावर गोळ्या झाडल्या, असं तो म्हणाला होता.

हत्याकांडात वापरलेली बोलेरो राजस्थानमधून आणली

हल्लेखोरांनी वापरलेली बोलेरो जीप ही राजस्थानवरुन आणल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. नसीब खानने रावतसरवरुन ही बोलेरो आणली होती. त्याने ही गाडी फतेहाबादमध्ये चरणजीतला दिली. तिथून चरणजीत ही गाडी पंजाबमधून घेऊन आला होता. याच गाडीतून मुसेवालाची रेकी करण्यात आली.

जोधपूरमधून हत्यारांचा पुरवठा

दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासात लॉरेन्सने पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये गँगस्टर्सची लपून बसण्याची ठिकाणं आणि शस्त्र पुरवठा करणाऱ्यांची नावं सांगितली आहेत. यातीलच कुणीतरी मुसेवालाची हत्या करण्यासाठी शस्त्र पुरवठा केला असेल असा संशय पोलिसांना आहे.

29 मे रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या

सिद्धी मुसेवाला याची 29 मे रोजी हत्या करण्यात आली. जीपमधून आपल्या गावी जात असताना भरदिवसा मुसेवालावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यानंतर मुसेवाला त्याच्या जीपमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या शरिराची चाळण झाली होती. मुसेवालाच्या शरिरावर एकूण 23 जमखा असल्याचं पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं होतं. गोळीबारानंतर अवघ्या 15 मिनिटांत मुसेवालाचं प्राण सोडला. 14 ते 15 गोळ्या मुसेवालाच्या शरीरातून आरपार गेल्या होत्या. त्याच्या शरीराच्या पुढील भागात तीन ते चार गोळ्या तर उजव्या हाताच्या कोपरावर एक गोळी लागली होती. तसंच यकृत, किडनी आणि पाठीच्या कण्यालाही गोळी भेदून गेली होती.

कोण आहे संतोष जाधव?

संतोष जाधव हा मंचरचा सराईत गुन्हेगार ओंकार बाणखेले खुनाचा आरोपी आहे. हत्येनंतर पुणे क्राइम ब्रांच संतोषच्या शोधात आहे. सूर्य उगवताच तुला संपवून टाकेन, अशी ओंकारला धमकी त्याने दिली होती. तसेच संतोष जाधव हा लॉरेन्स बिष्णोईच्या गँगचा सदस्य असल्याचे समोर आले आहे. सिद्धू मुसावालाच्या हत्येत सहभागी असलेल्या आठपैकी दोन शूटर पुण्यातले आहेत. त्यात सौरव महाकाळ याच्यासह संतोष जाधव याचाही समावेश आहे.

‘…तर संतोषने पोलिसांच्या स्वाधीन व्हावं’

सिंद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पुण्यातील संतोष जाधवचं नाव समोर आल्यानंतर त्याच्या आईची प्रतिक्रिया आलीय. माझा मुलगा हत्येत सहभागी असेल तर त्याने पोलिसांच्या स्वाधिन व्हावं. तो हत्याकांडात सहभागी नसेल असं मला वाटतं, त्याचं नाव गोवलं गेलं आहे. कुणी सुरुवातीपासून गुन्हेगार नसतो. त्यासोबत काहीतरी गोष्टी घडतात आणि तेव्हा तो गुन्हेगार बनतो. पोलिसांनी फक्त संशय व्यक्त केलाय. तो 23 वर्षाचा आहे, इतको मोठा शूटर होऊ शकत नाही. चुकीचं केलं असेल तर त्याची शिक्षा त्यानं भोगावी. मी मुलाला पाठीशी घालणारी आई नाही, असं संतोषच्या आईने म्हटलंय.