उल्हासनगरमधील दुकानदाराला चोरट्यांचा चकवा, गल्ल्यावर केला हात साफ, दोघांना बेड्या

या चोरीत त्यांनी थोडी तितकी रक्कम लुटली नाही तर तब्बल 1 लाख 86 हजाराला दुकानदाराचा खिसा रिकामा (Thief) केला आहे. या घटनेने उल्हासनगरमधील दुकानदारही चक्रावून गेले आहेत.

उल्हासनगरमधील दुकानदाराला चोरट्यांचा चकवा, गल्ल्यावर केला हात साफ, दोघांना बेड्या
उल्हासनगरमध्ये दोन चोरांना बेड्या
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 10:05 PM

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये दोन चोरांनी दुकानदाराला (Robbery in Shop) गुगारा दिला. यांनी मोठ्या शिताफीने दुकानदाराला दुकानातून (Shop kipper) बाहेर जाण्यास भाग पाडलं आणि गल्ल्यावर आपला हात साफ केलाय. या चोरीत त्यांनी थोडी तितकी रक्कम लुटली नाही तर तब्बल 1 लाख 86 हजाराला दुकानदाराचा खिसा रिकामा (Thief) केला आहे. या घटनेने उल्हासनगरमधील दुकानदारही चक्रावून गेले आहेत. कारण हा चोरीचा नवा फंडा आजपर्यंत क्वचितच पाहिला असेल. दुकानदाराची चप्पल फेकून दिल्याचा बहाना सांगत दुकानदाराला बाहेर जायला आधी भाग पाडलं. त्यानंतर चोरांनी त्यांचे मनसुबे पुरे केले आणि शक्कल लढवत दुकान लुटलं. लुटीचा हा प्रकार पाहून अनेकांनी कपाळावर हात मारून घेतला आहे. अशी चकवा देणारी चोरी व्यापाऱ्यांनीही कदाचित पहिल्यांदाच पाहिली असेल.

नमकं काय झालं?

मोहन वाधवा यांचं उल्हासनगरच्या कॅम्प 5 मध्ये जीन्स गारमेंटचं दुकान आहे. 6 मार्च रोजी दुपारी 4 च्या सुमारास मोहन हे दुकानात बसलेले असताना एक तरुण दुकानात ग्राहक बनून आला आणि त्याने तुमची दुकानाबाहेर असलेली चप्पल कुणीतरी उचलून गल्लीत फेकल्याचं मोहन यांना सांगितलं. त्यामुळं मोहन हे उठून दुकानाबाहेर गेले असता, दुकानात आलेल्या भामट्याने गल्ल्यातील 1 लाख 86 हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला. याप्रकरणी मोहन यांच्या तक्रारीनुसार हिललाईन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांना या तपासात अनेक बाबी हाती लागल्या. त्याच्याच आधारे पोलीस या चोरांपर्यंत पोहोचले.

दोन आरोपी गजाआड

यामध्ये साहिल कुकरेजा आणि राजवीर सिंग लबाना या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम हस्तगत करण्यात आली असून त्यांनी इतर कुठे चोऱ्या केल्या होत्या का? याचा तपस पोलीस करतायत. हे सराईत चोर पोलिसांच्या ताब्यत सापडल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांना यांना पकडण्यासाठी मोठी पायपीट करावी लागली आहे. बरेच दिवस शोध घेल्यानंतर यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलाय. त्यामुळे पोलीसांची डोकदुखी संपली आहे. या भागात मागील काही दिवसात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनाही थांबवण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.

चुलतीचं घर हडपण्यासाठी पठ्ठ्यानं थेट न्यायाधिशांचीच सही हाणली, बनावट शिक्काही छापला!

मोबाईलवर बसला म्हणून दिव्यांगाला बेदम मारहाण, कुठं घडला अमानुष प्रकार?

Alto आणि Swift कारचा भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघे ठार, पुतणी थोडक्यात बचावली!