AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुलतीचं घर हडपण्यासाठी पठ्ठ्यानं थेट न्यायाधिशांचीच सही हाणली, बनावट शिक्काही छापला!

न्यायाधीश न्यायदानाचे (Court) काम करतात त्यांच्याच नावाची बनावट सही (Duplicate Signature) केल्याचा प्रताप उघड झाला आहे. चुलतीच्या नावावर असलेले राहते घर त्यांच्या मृत्यूपश्चात वारसा हक्काने मिळवण्यासाठी पुतण्यानेच (Fraud) हा प्रताप केलाय.

चुलतीचं घर हडपण्यासाठी पठ्ठ्यानं थेट न्यायाधिशांचीच सही हाणली, बनावट शिक्काही छापला!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 9:13 PM
Share

सोलापूर : सोलापुरात कोण कधी काय करेल याचा नेम नाही. कारण जे न्यायाधीश न्यायदानाचे (Court) काम करतात त्यांच्याच नावाची बनावट सही (Duplicate Signature) केल्याचा प्रताप उघड झाला आहे. चुलतीच्या नावावर असलेले राहते घर त्यांच्या मृत्यूपश्चात वारसा हक्काने मिळवण्यासाठी पुतण्यानेच (Fraud) हा प्रताप केलाय. न्यायाधिशांची बनावट सही आणि शिक्क्याचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघड झाला आहे. नजीर पल्ला असे या प्रकरणातील आरोपी पुतण्याचे नाव आहे. सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आलाय. सरकारी पक्षाच्यावतीने नगर भूमापन कार्यालयातील परिक्षण भूमापक समीर खाटीक यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे. विशेष बाब म्हणजे हा सर्व प्रकार आरोपीच्या भावानेच चव्हाट्यावर आणला आहे. आरोपी नजीर अहमद पल्ला याचा भाऊ शौकत पल्ला यांनी या प्रकाराविरोधात तक्रार दिली होती.

जागा बळकावण्याचा प्लॅन आखला

शौकत आणि नजीर अहमद पल्ला यांच्या काकू शरीफाबी पल्ला यांच्या नावे सोलापूर शहरातील बुधवार पेठ येथे सुमारे 2 गुंठे जागा होती. या जागेत चार खोल्यांचे घर आणि दुकान देखील आहे. या जागी तक्रारदार शौकत पल्ला हे अनेक वर्षांपासून काका-काकूसोबत राहत होते. काकू शरीफाबी पल्ला यांचा 12 मे 2008 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर काही वर्षांनी तक्रारदार शौकत पल्ला आणि नजीर पल्ला या दोघांमध्ये काही वाद झाले. तेव्हापासून नजीर अहमद पल्ला यांनी ही मिळकत बळकवण्याचा डाव आखल्याचा आरोप शौकत पल्ला यांनी केला आहे.

न्यायाधिशांची बनावट सही करुन घर नावावर

मयत शरीफाबी पल्ला यांना मूल नसल्याने आरोपी नजीर अहमद पल्ला याने त्याच्या नावाने बनावट वारस प्रमाणपत्र तयार केले. त्यासाठी दिवाणी न्यायाधिशांचा बनावट शिक्का तयार केला. तसेच बनावट स्वाक्षरी करत प्रमाणपत्र तयार केले. धक्कादायक बाब म्हणजे बनावट प्रमाणपत्र नगर भूमापन कार्यालयाकडे सादर करुन जागा स्वत:च्या नावावर करुन घेतली. विशेष म्हणजे याच घरात भाड्याने राहणाऱ्या भाडेकरुला कवडी मोल भावात ही जागा विकली देखील. बुधवार पेठ ते सोलापूर एसटी स्टॅण्ड येथील मुख्य रस्त्यावर बाजारभावाप्रमाणे मिळकतीचे मुल्य हे जवळपास 1 कोटी रुपये इतके आहे. मात्र आरोपी नजीर पल्ला याने अवघ्या 13 लाख रुपये इतक्या कवडी मोल भावात ही जागा विकल्याची माहिती तक्रारदार शौकत पल्ला यांनी दिली.

हा प्रकार उघडकीस आला

संबंधित जागेवर 4 खोल्यांचे घर आणि एक दुकान आहे. जागा मोठी असल्याने शौकत पल्ला यांनी भाडेकरु ठेवला होता. गेल्या अनेक महिन्यापासून या भाडेकरुने भाडे देणे बंद केले. या भाडेकरूचा भाडे करारपत्र एप्रिल 2022 साली संपणार होते. त्यामुळे शौकत पल्ला यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीला भाडेकरूस जागा खाली करण्यास सांगितली. त्यावेळेव भाडेकरूने आपण ही जागा विकत घेतल्याची माहिती दिली. तसेच खरेदी व्यवहाराचे कागदपत्रे दाखविले. त्यावेळी शौकत पल्ला यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यानंतर त्यांनी कार्यालयात जाऊन अधिक चौकशी केली असता भाऊ नजीर अहमद पल्ला याने हा व्यवहार केल्याची माहिती लक्षात आली. त्यानंतर शौकत पल्ला यांनी प्रहार जनशक्ती संघटनेचे जमीर शेख यांच्याशी संपर्क केला. जमीर शेख यांनी संपूर्ण प्रकरण तपासून पाहिले असता न्यायालयाचा बनावट शिक्का आणि सहीचा वापर झाल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान या प्रकरणी सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात भांदवि 419, 420, 465, 467, 468, 471 कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर बझार पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पोपटराव धायगुडे यांनी दिली.

मोबाईलवर बसला म्हणून दिव्यांगाला बेदम मारहाण, कुठं घडला अमानुष प्रकार?

Alto आणि Swift कारचा भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघे ठार, पुतणी थोडक्यात बचावली!

Kandiwali मध्ये चाळीतलं घर कोसळून एका निष्पाप मुलाचा जीव गेला! चौघेजण जखमी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.