2 रिसॉर्ट, 2 नेते, 200 गाड्या आणि 400 कार्यकर्ते, दापोलीतल्या महानाट्यात नक्की घडतंय काय?

सुरूवातील किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवलं, राष्ट्रवादीचा विरोध झाला. तरीही सोमय्या कोकणात पोहोचले. त्यांना लगेज भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) जॉईन झाले. दोघांनी मिळून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.

2 रिसॉर्ट, 2 नेते, 200 गाड्या आणि 400 कार्यकर्ते, दापोलीतल्या महानाट्यात नक्की घडतंय काय?
किरीट सोमय्या यांचं ठिय्या आंदोलनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 7:51 PM

रत्नागिरी : आज कोकणाच्या राजकारणाचा पारा कडाक्याच्या उन्हाच्या पाऱ्यापेक्षाही जास्त चढलाय. किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) कोकण दौऱ्यानं कोकणातलं राजकारण सध्या ढवळून निघालंय. अनिल परबांचं (Anil Parab) कथित रिसॉर्ट पाडण्यासाठी सोमय्या कोकणात पोहोचले.  सुरूवातील किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवलं, राष्ट्रवादीचा विरोध झाला. तरीही सोमय्या कोकणात पोहोचले. त्यांना लगेज भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) जॉईन झाले. दोघांनी मिळून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. मात्र यावेळी फक्त हे दोन्ही नेतेच नाही तर मोठा फौजफाटाही सोबत दिसून आला. या दोन रिसॉर्टचा वाद राज्यातल्या घराघरात आज पोहोचला आहे. या दोन रिसॉर्टविरोधात मैदानात उतरलेले दोन नेते, किरीट सोमय्या आणि निलेश राणे सरकारवर तुटून पडत आहे. मात्र हे दोन नेतेच नाही. तर तब्बल 200 गाड्या आणि 400 कार्यकर्ते दापोलीत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनाही नेमकं काय करावं आणि काही नाही, हे समजायला थोडा वेळ लागला.

सोमय्यांच्या हत्येचा कट-निलेश राणे

निलेश राणे यांनी आपल्याला सांगितंल आहे की किरीट सोमय्याचा हत्या असं कटकारस्थान दापोली पोलीस स्टेशन एसपी आणि शिवसेना यांचं झालं आहे. मुंबई, रायगड येथून रत्नागिरी येथे आलो. आमच्या कार्यकर्त्यांना अर्ध्या किलोमीटरवर अडवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांकडून घातपाताची शक्यता असल्याचं पोलिसांनी दिलं. आम्हाला रिसॉर्टला जायचंय आम्ही जाणार आहे. आम्हाला पोलीस स्टेशनला या सांगितलं. चार जणांना यायला सांगितलं. कमांडोंचं म्हणनं आहे की सुरक्षेची खात्री होत नाही तोवर इथून बाहेर पडून नका असं सांगितंल. मुंबईहून दीडशे ते दोनशे गाड्या आणि तीनशे ते चारशे कार्यकर्ते दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

जमावबंदीचे आदेश असताना सोमयांचं शक्तिप्रदर्शन

दरम्यान, दापोली पोलिसांकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते. तसंच दापोलीत प्रवेश करताना सोमय्या यांना पोलिसांकडून नोटीसही देण्यात आली होती. मात्र, सोमय्या हे मोठं शक्तिप्रदर्शन करत दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. आता दापोली पोलिसांकडून सोमय्या यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. इतकंच नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्यास कारवाई तर होणारच, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलाय.  उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस थोड्या स्पष्ट, स्वच्छ, अलंकारिक भाषेत उत्तर देतात. पण मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, तुमच्या सांगण्यावरुन तुम्हाला अटक होणार नाही. तुमचा भ्रष्टाचार समोर आला की तुम्हाला सांगण्याचीही गरज भासणार नाही. तुमच्याविरोधात कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही, अशा शब्दात सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय.

Kirit Somaiya : पोलिसांकडून FIR नाही! किरीट सोमय्यांचा ठिय्या, घातपाताचा कट आखल्याचा गंभीर आरोप

Breaking : किरीट सोमय्यांना दापोली पोलिस ताब्यात घेणार, नोटीसही बजावली; आता पुढे काय?

TOP 9 Headlines | 26 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.