लोकांच्या दुचाकी पळवायचा, पेट्रोल संपलं की तिथेच सोडायचा, चोराचं चोरीचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले

| Updated on: Aug 07, 2021 | 7:15 PM

उल्हासनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. या चोरीच्या घटनांची दखल घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. अखेर पोलिसांना तपासात काही प्रमाणात यश आलं आहे.

लोकांच्या दुचाकी पळवायचा, पेट्रोल संपलं की तिथेच सोडायचा, चोराचं चोरीचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले
लोकांच्या दुचाकी पळवायचा, पेट्रोल संपलं की तिथेच सोडायचा, चोराचं चोरीचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले
Follow us on

उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. या चोरीच्या घटनांची दखल घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. अखेर पोलिसांना तपासात काही प्रमाणात यश आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. हा तरुण स्वत:च्या मौजमस्तीसाठी दुचाकी चोरी करायचा. चोरी केलेल्या दुचाकी शहरात ऐटीत फिरवायचा. या दरम्यान गाडीतील पेट्रोल संपलं की तिथेच गाडी सोडून द्यायचा. अखेर याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पोलिसांनी आरोपीकडून 4 दुचाकी जप्त केल्या आहेत.

केवळ मौजमजा म्हणून दुचाकींची चोरी

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. यावेळी एक अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. हा चोरटा केवळ मौजमजा म्हणून दुचाकी चोरायचा. दुचाकी चोरुन ती फिरवायची आणि जिथे त्यातलं पेट्रोल संपेल, तिथेच ती टाकून द्यायची, असा त्याच्या दिनक्रम सुरू होता.

स्वतःची हौस भागवण्यासाठी चोरी

आरोरीने अशाच पद्धतीने त्याने चार दुचाकी चोरल्या होत्या. एका दुचाकीसह त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने उर्वरित तीन दुचाकी कुठे कुठे टाकून दिल्या, याचा ठावठिकाणा पोलिसांना सांगितला. स्वतःची दुचाकी घेणं परवडत नसल्याने आपण लोकांच्या दुचाकी चोरुन फिरवायचो आणि स्वतःची हौस भागवायचो, अशी कबुली या चोरट्याने पोलिसांसमोर दिली आहे. या चोरट्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे.

हेही वाचा :

शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल, आई-वडिलांचा आक्रोश

जप्त केलेल्या वाहनाच्या इंजिन आणि बॅटरीला पाय फुटले? जुन्नरच्या ‘त्या’ घटनेवर पोलीस-महसूल विभाग गप्प