खाडीत सुटकेस, सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह, ठाण्यात भयानक मर्डरमुळे खळबळ!

कल्याणच्या शीळ रोडवर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीचा सुटकेसमध्ये मृतदेह आढळला आहे. आता आरोपीला शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

खाडीत सुटकेस, सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह, ठाण्यात भयानक मर्डरमुळे खळबळ!
suitcase dead body and kalyan thane crime news
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 24, 2025 | 4:32 PM

Thane Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात खुनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी तर महिलांचा, अल्पवयीन मुलीचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय. हीच बाब लक्षात घेऊन राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असे म्हणत राज्यातील पोलीस नेमकं काय करत आहेत, असा सवाल उपस्थित केला जातोय. असे असतानाच आता राज्यात खळबळ उवडून देणारी एक मोठी घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शीळ रोवर एका तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला आहे.

देसाई खाडीत एकच खळबळ उडाली

मिळालेल्या माहितीनुसार कल्याणच्या शीळ रोडवर एका सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला आहे. देसाई खाडी परिसरात हा मृतदेह आढळला आहे. ही घटना समोर आल्यानंतर देसाई खाडीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह सापडलेल्या तरुणीचे वय 28 ते 30 वर्षे आहे. तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये फरून फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत्यू झालेली तरुणी नेमकी कोण?

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला आहे. तसेच फॉरेन्सिक टिमकडून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. डाकघर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यू झालेली ही तरुणी नेमकी कोण आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदनानंतर तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकते. तसेच ही तरुणी नेमकी कोण आहे, हे शोधण्याचेही आव्हान आता पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

पोलीस आरोपीचा शोध कसा घेणार?

या प्रकरणात मृत्यू झालेली तरुणी ही नेमकी कोण आहे हेच माहिती नसल्यामुळे आरोपीचा शोध तरी कसा घ्यावा? असे कोडे पोलिसांना पडले आहे. पोलीस सध्या खाडी परिसराची तपासणी करत आहेत. तसेच भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर काही तांत्रिक बाबींची मदत घेऊन पोलीस आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. भविष्यात या प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.