AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Police | बायको-मुलाचं मोठेपणा मिरवणं, पोलीस अधिकाऱ्याच्या चांगलच अंगाशी आलं, एक क्लिक आणि मग….

Police | सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झालेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? या पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ काय कारवाई झाली आहे? बायको-मुलांमुळे हा पोलीस अधिकारी चांगलाच अडचणीत सापडलाय.

Police | बायको-मुलाचं मोठेपणा मिरवणं, पोलीस अधिकाऱ्याच्या चांगलच अंगाशी आलं, एक क्लिक आणि मग....
police officer familyImage Credit source: social media
| Updated on: Jun 30, 2023 | 10:17 AM
Share

लखनऊ : नोटांच्या बंडलसोबत कुटुंबीयांचा सेल्फी व्हायरल झाल्याने एक पोलीस अधिकारी अडचणीत सापडला आहे. या पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ बदली झाली आहे. त्याच्यामागे चौकशीचा सेसमिरा लागलाय. या पोलीस अधिकाऱ्याची बायको आणि मुलाने 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलसोबत सेल्फी काढले. मोठेपणा दाखवण्यासाठी काढलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सोशल माीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन्ही मुलं बेडवर बसलेली आहेत. तिथे 500 रुपयांच्या नोटांची बंडलं मांडलेली आहेत. ही एकूण रक्कम 14 लाखाच्या घरात आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.

स्वत:चा बचाव करताना या पोलीस अधिकाऱ्याने काय सांगितलं?

हा फोटो बाहेर येताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. संबंधित पोलीस अधिकारी उत्तर प्रदेश उन्नावचा आहे. रमेश चंद्र साहानी असं पोलीस अधिकाऱ्याच नाव असून त्याची पोलीस लाइनमध्ये बदली करण्यात आली आहे. फोटो बाहेर आल्यानंतर रमेश चंद्र साहानी यांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, “हे फोटो 14 नोव्हेंबर 2021 चे आहेत, जेव्हा मी माझी फॅमिली प्रॉपर्टी विकली होती” वरिष्ठ पोलीस अधिकारी काय म्हणाला?

“स्टेशन हाऊस ऑफिसरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलं नोटांच्या बंडलसोबत दिसतायत. आम्ही या फोटोची दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्याची बदली केलीय आणि चौकशी सुरु केली आहे” असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

Follow Us
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका पद...
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? कौल यांचा टेन्शन वाढवणारा युक्तिवाद!
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग....
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
Mega Bharti | 1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या माहिती
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर मोठं संकट, 4-5 दिवसांत पाऊस नाही तर...
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
Laxman Hake | हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार! लक्ष्मण हाकेंनी GR जाळून सरकारला सुनावलं
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
Asim Sarode | शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?