
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दोन लोकांना ताब्यात घेतलं आहे. त्या दोघांनी केंद्रातील भाजपच्या (BJP) मोठ्या लोकांशी ओळखी असल्याचं सांगून फसवणूक केली आहे. मध्य दिल्लीचे डीसीपी संजय सेन यांना ९ मेला भाजप मुख्यालयाकडून एक तक्रार दाखल झाली होती. केंद्रातल्या काही नेत्यांना आणि मंत्र्यांसोबत (Central Minister)चांगले संबंध असल्याचे सांगून काही लोकांना लाखो रुपयांना फसवले आहे, त्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर सेलच्या पोलिसांनी चौकशी सुरु केली.
पोलिसांनी त्या व्यक्तीची माहिती काढली आहे, मोबाइल नंबरवरुन असं समजलं आहे की, त्या व्यक्तीचं नाव प्रवीण सिंह असं आहे. तो व्यक्ती दिल्लीच्या घडोली परिसरात राहत आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला कांट्रेक्टर असल्याचं सांगून एका ठिकाणी बोलावलं. आरोपी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला.
ज्यावेळी आरोपीची चौकशी झाली, त्यावेळी त्या आरोपीनी इंटरनेटवरुन भाजपमधील नेत्यांची सगळी माहिती जमा केली आहे. त्यानंतर काही नेत्यांच्या तो संपर्कात आला. त्याने लोकांना सांगितलं आहे की, भाजपच्या केंद्रीय कार्यालयात काम करीत आहे. आरोपींनी त्या अनेकांना मोठी जिम्मेदारी देण्याच्या नावाखाली कार्यकर्त्यांकडून मोठी रक्कम घेतली आहे.
आरोपीने अनेक ठेकेदारांकडून मोठी रक्कम घेतली आहे. या प्रकरणात आरोपी पीयूष कुमार श्रीवास्तव याला लखनऊमधून अटक केली आहे. तो स्वत :बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांचा ओएसडी असल्याचं सांगत होता. तो एक एनजीओ सुध्दा चालवत होता. त्याचं नाव भारतीय इनक्लूसिव डेवलपमेंट फाउंडेशन असं आहे. आतापर्यंत ४० लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्याने त्याच्या खात्यावर घेतली आहे. तर दुसरा आरोपी हा प्रवीण १२ वी पास आहे. पीयूष कुमार श्रीवास्तव याने एमबीए केलं आहे.