AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash Update : अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला ? अखेर उघड होणार सत्य, Blackbox मध्ये काय सापडणार ?

बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, आता 'ब्लॅक बॉक्स' हा तपासाचा मुख्य आधार आहे. लिअरजेट ४५ विमानातील CVR आणि FDR रेकॉर्डरमधून वैमानिकांचे शेवटचे संभाषण आणि तांत्रिक डेटा मिळवला जाईल. VSR व्हेंचर्सच्या विमानात बिघाड कशामुळे झाला हे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

Ajit Pawar Plane Crash Update : अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला ? अखेर उघड होणार सत्य, Blackbox मध्ये काय सापडणार ?
बारामती विमान अपघातImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jan 28, 2026 | 4:36 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ व्हीएसआर व्हेंचर्स विमान (नोंदणी क्रमांक व्हीटी-एसएसके) कोसळले. मोठा स्फोट झाला आणि विमान आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं. या अपघातात विमानातील अजित पवार, पायलट कॅप्टन सुमित, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या पाचही जणांना प्राण गमवावे लागले. या छोट्या चार्टर्ड विमानात ब्लॅक बॉक्स होता का? आणि त्याची तपासात मदत कशी होईल ? ते जाणून घेऊया.

या विमानात ब्लॅकबॉक्स होता. लेअरजेट 45 हे विमान अत्यंत कडक सुरक्षा मानकांनुसार (FAR Part 25) बनवले आहे . त्यात फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) दोन्ही आहेत, ज्यांना एकत्रितपणे “ब्लॅक बॉक्स” म्हणून संबोधले जाते.

DGCA ची टीम आता ब्लॅक बॉक्स परत मिळवेल आणि त्याची चौकशी सुरू करेल. रिपोर्ट्सनुसार, लहान आणि खाजगी विमानांवर ब्लॅक बॉक्स अनिवार्य नसतात. पण जर चार्टर्ड विमानाचे वजन एका विशिष्ट वजनापेक्षा (सामान्यतः ५,७०० किलोपेक्षा जास्त किंवा विमान वाहतूक प्राधिकरणाच्या नियमांनुसार) जास्त असेल किंवा जर ते व्यावसायिकरित्या वापरले जात असेल तर फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) असणे अनिवार्य आहे.

ब्लॅक बॉक्स हा विमानाचा सर्वात मजबूत भाग असतो, जो अपघातानंतरही सुरक्षित राहतो. त्याचे दोन मुख्य भाग असतात :

CVR (कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर): हे वैमानिकांमधील शेवटचं संभाषण रेकॉर्ड करतं. अपघातापूर्वी कॉकपिटमध्ये कोणते अलार्म वाजले किंवा वैमानिकांनी कोणते आपत्कालीन संदेश दिले हे सीव्हीआर उघड करतं.

FDR (फ्लाइट डेटा रेकॉर्डर): यामध्य़े विमानाचा वेग, उंची, इंजिनची स्थिती आणि दिशा यासारख्या तांत्रिक डेटाची नोंद केली जाते.

नाव ‘ब्लॅकबॉक्स’ पण रंग असतो ‘नारिंगी’

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याचं नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी त्याचा रंग काळा नव्हे तर नारिंगी असतो. हा बॉक्स कोणत्याही ढिगाऱ्यात किंवा कचऱ्यात अथवा घनदाड जंगलात शोधणं सोपं व्हाव म्हणून याचा रंग असा नारिंगी असतो. त्यात एक बीकन देखील असतो जो पाण्याखाली किंवा जमिनीखाली असतानाही 30 दिवस सिग्नल पाठवत राहतो.

VSR व्हेंचर्सचा विवादीत इतिहास

अजित दादांचा अपघात झाला ते विमान VSR व्हेंचर्स कंपनीचं असून त्याचा इतिहास वादग्रस्त आहे,तपासाधीन आहे. 2011 मध्ये स्थापन झालेल्या या दिल्लीस्थित कंपनीचा 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विमानतळावर विमान अपघात झाला होता. आता बारामतीच्या या दुर्घटनेनंतर, कंपनीच्या सुरक्षा ऑडिट आणि विमान देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कसे उलगडणार गूढ ?

या विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर त्यातील डेटा कॉम्प्युटरवर डीकोड केला जाईल, ज्यामुळे अपघात तांत्रिक बिघाड, हवामान किंवा मानवी चुकीमुळे झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल. 9752 किलो वजनाचे हे विमान लँडिंग स्ट्रिपपर्यंत का पोहोचू शकले नाही याचे उत्तर आता ब्लॅक बॉक्समध्ये अडकले आहे.

अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!.
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार.
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत.