गोळीबार केल्याची कबुली दिल्यानंतर अभिनेत्याविरोधात पोलिसांची मोठी कारवाई
KRK Firing Case : मुंबईतील झालेल्या गोळीबार घटनेप्रकरणी पोलिसांनी कमाल रशीद खान उर्फ केआरके याला अटक केली आहे. आता मुंबई पोलिसांनी अभिनेता केआरकेचा शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी कागदपत्रे सादर केली आहेत.

KRK Firing Case : मुंबईतील झालेल्या गोळीबार घटनेप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान उर्फ केआरके ( Kammal R khan) याने लेखक-दिग्दर्शक आणि एका स्ट्रगलिंग मॉडेलच्या घरावर झालेल्या गोळीबार केला होता. अंधेरीतील एका गृहनिर्माण सोसायटीतील गोळीबार प्रकरणात गेल्या शनिवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर वर्सोवा पोलिसांनी मंगळवारी अभिनेता कमाल आर खानला जारी केलेला शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात कागदपत्रे सादर केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जानेवारी रोजी खानच्या बंगल्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर असलेल्या नालंदा इमारतीमधील पटकथा लेखक नीरज मिश्रा आणि मॉडेल प्रतीक बैद यांच्या फ्लॅटमध्ये एका कपाटात आणि भिंतीमध्ये दोन गोळ्या अडकलेल्या आढळल्या. त्या केआरकेच्या परवानाधारक बंदुकीतून झाडण्यात आल्याची देखील माहिती देखील समोर आली आहे.
मंगळवारी, पोलिसांनी खानला अंधेरी न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती ,मात्र कोर्टाने खानला न्यायालयीन कोठडीत पाठवलं. पोलिसांनी सांगितले की, खानने सांगितलेल्या 30 गोळ्यांपैकी दोन आधीच झाडल्या गेल्या असून, उर्वरित गायब असलेल्या सात गोळ्या जप्त करायच्या आहेत.
जबाबात काय म्हणाला केआरके?
जबाबात केआरकेने गोळीबार केल्याची कबुली दिली. एवढंच नाही तर, त्याने परवानाधारक बंदूक वापरल्याचे सांगितले. मात्र आपला कोणालाही इजा करण्याचा हेतु नव्हता असही त्याने सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आता याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
