AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोलीत कोब्रा सोडून 25 वर्षीय पत्नीची हत्या, पतीला दुहेरी जन्मठेप

बचाव पक्षाने सुरजला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र सुरजला जन्मठेपेची शिक्षा सुरु करण्यापूर्वी दोन आरोपांखाली सलग 10 वर्षे आणि 7 वर्षे शिक्षा भोगावी लागेल. त्याला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

खोलीत कोब्रा सोडून 25 वर्षीय पत्नीची हत्या, पतीला दुहेरी जन्मठेप
केरळात नाग सोडून पत्नीच्या हत्येप्रकरणी पती दोषी
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 13, 2021 | 2:16 PM
Share

तिरुअनंतपुरम : पत्नीला सर्पदंश करुन तिची हत्या केल्याप्रकरणी केरळातील पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हुंड्यासाठी 25 वर्षीय पत्नी उत्तराचा छळ करुन हत्या केल्याप्रकरणी सुरज दोषी आढळला होता. कोल्लमच्या सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत शिक्षेची सुनावणी केली.

बचाव पक्षाने सुरजला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र सुरजला जन्मठेपेची शिक्षा सुरु करण्यापूर्वी दोन आरोपांखाली सलग 10 वर्षे आणि 7 वर्षे शिक्षा भोगावी लागेल. त्याला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पत्नी उत्तरा कोल्लमपासून 40 किमी अंतरावर तिच्या मामाच्या घरात राहत होती. झोपेत असताना त्याला नाग चावला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना 7 मे 2020 रोजी घडली होती. त्यावेळी सुरज-उत्तराच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती आणि त्यांना एक वर्षाचे मूलही आहे.

फिर्यादींनी उत्तराचा पती सुरज एस कुमारवर आरोप केला आहे की त्याने पत्नीच्या खोलीत मुद्दाम कोब्रा सोडला होता, जेणेकरुन नागाने चावा घेतल्यामुळे तिचा मृत्यू होईल. हा संपूर्ण कट रचण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले आहे की गेल्या वर्षी 2 मार्च रोजीही सुरजने पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता.

आधीही नाग सोडून हत्येचा प्रयत्न

2 मार्च 2020 रोजी, पथानामथिट्टा जिल्ह्यातील अदूरजवळ पारकोडे येथे पतीच्या घरी असताना उत्तराला नाग चावला होता. त्यावेळी तिरवल्ला येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात तिच्यावर जवळपास 16 दिवस उपचार करण्यात आले होते. रसेल वायपर साप चावल्यामुळे ती पूर्णपणे आजारी पडली होती. ती 52 दिवस अंथरुणावर पडून होती. यानंतर तिची प्लास्टिक सर्जरीही करावी लागली होती.

काय घडलं होतं

उत्तराच्या आईच्या दाव्यानुसार तिची मुलगी आणि सुरज जेवणानंतर झोपायला गेले होते. सुरज उशिरा उठायचा. पण दुसऱ्या दिवशी तो लवकर उठून बाहेर गेला होता. तर उत्तराला नेहमीच्या वेळेवर जाग आली नव्हती. तिची आई खोलीत गेली तेव्हा तिला उत्तरा बेशुद्धावस्थेत आढळली होती. नंतर खोलीची झडती घेतली असता तिथे एक नाग सापडला, ज्याला ठार मारण्यात आले.

दहा लाखांची रोकड, कार-सोनं हुंड्यात

सुरजला हुंडा देण्यात आला. यामध्ये 10 लाख रुपये रोख, मालमत्ता, नवीन कार आणि सोन्याचा समावेश होता. दोन वर्षांच्या अयशस्वी विवाहानंतरही त्याने अधिक हुंडा मागण्याचा प्रयत्न केला, असा आरोप उत्तराच्या आईने केला.

उत्तराच्या मृत्यूवरुन तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयाच्या आधारे सुरजला 24 मे रोजी अटक करण्यात आली होती. 12 जुलै रोजी सुरजने जाहीरपणे कबूल केले की त्याने कोल्लममधील परीपल्ली येथील गारुडी सुरेश कुमार यांच्याकडून 10 हजार रुपयांना दोन वेळा साप खरेदी केले होते.

आरोपपत्रामध्ये काय काय

माजी ग्रामीण एसपी एस हरिशंकर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने उत्तराचे शवविच्छेदन आणि सापाच्या शव चाचणीसारखे वैज्ञानिक पुरावे न्यायालयात सादर केले होते. 1 नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार सुरजने दोन वेळा विषारी साप सोडून उत्तराला मारण्याचा प्रयत्न केला होता.

सुरजला विषारी साप सुपूर्द करणारा गारुडी हा या प्रकरणातील आरोपी असला, तरी 1 डिसेंबरपासून सुरु झालेल्या खटल्यात तो सरकारी साक्षीदार बनला. सुनावणीदरम्यान, त्याने हेतू जाणून घेतल्याशिवाय सुरजला नाग सुपूर्द केल्याचे न्यायालयाला सांगितले. सुरजवर पत्नीची हत्या केल्याचा आरोप होता, तर त्याचे आई-वडील आणि बहिणीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप होता. उत्तराचे पालक विजयसेनन आणि मणीमेगलाईसह अनेक जण या खून प्रकरणाच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.

संबंधित बातम्या :

खोलीत साप सोडून सासूची हत्या, प्रियकराच्या साथीने सुनेचं षडयंत्र, सरन्यायाधीश म्हणाले, लायकी नाही तुमची…

सोन्याच्या दागिन्यांचा हव्यास, चुलत सासूची हत्या करुन सुनेने दागिने ओरबाडले, कानाचेही लचके

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?