बाबू तुझा झाला नाही, तर मग…बाबूने सगळ्यानाच दिला धक्का
शनिवारी संध्याकाळी तो घरातून शौचासाठी निघाला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. सत्यमच्या एका सोशल मीडिया पोस्टने या घटनेला एक नवीन वळण दिलं आहे. या पोस्टमध्ये सत्यमने एक फोटो अपलोड केलाय.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. बाबू नावाच्या एका युवकाच नुकतच लग्न झालं होतं. त्याने लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ‘बाबू तुझा झाला नाही, तर अजून कोणाचा होणार नाही’ असं बाबूने त्याने पोस्टमध्ये लिहिलं होतं. बाबूचा मृतदेह गावाच्या बाहेर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. हा प्रेम प्रकरणाचा विषय आहे.
बाराबंकीच्या रामसनेहीघाट येथील हे प्रकरण आहे. इथे राहणारा युवक सत्यम मिश्राचा मृतदेह सकौली येथे एका बागेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता. शनिवारी संध्याकाळी तो घरातून शौचासाठी निघाला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. सत्यमच्या नातेवाईकांनुसार त्याचे प्रेमसंबंध सुरु होते. याच कारणामुळे गावचे प्रधान आशीष मिश्रा आणि पत्नी भावना मिश्रा यांनी सत्यमची हत्या करुन मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप होतोय.
पण तो प्रेयसीला विसरला नाही
सत्यमच्या एका सोशल मीडिया पोस्टने या घटनेला एक नवीन वळण दिलं आहे. या पोस्टमध्ये सत्यमने एक फोटो अपलोड केलाय. या फोटोसोबत लिहिलय की, ‘बाबू तुझा झाला नाही, तर अजून कोणाचा होणार नाही’. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवकाच नुकतच लग्न झालं होतं. पण लग्नामुळे तो आनंदी नव्हता. नातेवाईकांच्या दबावाखाली त्याने हे लग्न केलं होतं. पण तो प्रेयसीला विसरला नाही. म्हणूनच या अपराधीपणाच्या भावनेतून त्याने आत्महत्येसारख टोकाच पाऊल उचललं.
राजकीय पक्षाशी संबंधित
सत्यम मिश्राच्या कुटुंबियांनुसार तो एका राजकीय पक्षाशी संबंधित होता. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये राज्यमंत्री सतीश चंद्र शर्मा यांच्यासोबत फोटो आहे. तो भाजपच्या कार्यक्रमात नेहमी सहभागी व्हायचा. लग्नानंतर त्याची सक्रीयता थोडी कमी झाली होती. सत्यमची हत्या झाली की, त्यानेच जीवन संपवलं, हे शोधून काढणं पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे. सध्या पोलीस तथ्याच्या आधारावर प्रकरणाची चौकशी करत आहेत.
