‘ना मला राजा रघुवंशी बनायचय, ना सौरभ…’ नवऱ्याने घेतला मोठा निर्णय, सगळ्यांना धक्का
एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाला दहाच दिवस झाले होते. लग्नानंतर घरातून पाहुणे मंडळी निघून गेली. त्यानंतर नवविवाहित वधूने पतीजवळ बाहेर फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. दोघे बाजारात चाट खाण्यासाठी गेले. चाट संपल्यानंतर विवाहित अचानक गायब झाली.

मेरठच सौरभ राजपूत हत्याकांड त्यानंतर इंदूरची राजा रघुवंशी मर्डर केस. या दोन्ही घटनांनी काही नवऱ्यांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण केली आहे. बायको उद्या आपल्यासोबत अशी वागली तर? ही भिती अनेक नवऱ्यांच्या मनात बसली आहे. याच भितीपोटी उत्तर प्रदेशच्या चंदौलीमध्ये एका पतीने लग्नानंतर 10 दिवसातच पत्नीला गपचूप तिच्या बॉयफ्रेंडकडे सोपवलं. ‘ना मला राजा रघुवंशी बनायचय, ना सौरभ…’ असं तो म्हणाला. या दोघांची हत्या त्यांच्या पत्नीनेच विवाहबाह्य संबंधांमुळे केली होती.
मुगलसराय कोतवाली क्षेत्रातील सैदपुरा गावच हे प्रकरण आहे. इथे राहणारा युवक शमशेरच 4 जून रोजी मवई खुर्दची युवती खुशीसोबत लग्न झालं. लग्नानंतर घरातून पाहुणे मंडळी निघून गेली. त्यानंतर नवविवाहित वधूने पतीजवळ बाहेर फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दोघे 14 जून रोजी मुगलसराय येथे आले. दोघे बाजारात चाट खाण्यासाठी गेले. चाट संपल्यानंतर विवाहित अचानक गायब झाली. पती त्यामुळे हैराण झाला. त्याने पत्नीचा भरपूर शोध घेतला. पण ती नाही सापडली.
पोलिसांनी विवाहितेला तिच्या प्रियकरासोबत पकडलं
नवऱ्याने नंतर मुगलसराय कोतवाली पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांना महिला बेपत्ता असल्याच नोंदवून घेत तपास सुरु केला. मंगळवारी पोलिसांनी विवाहितेला तिच्या प्रियकरासोबत वाराणसी येथे पकडलं. त्यानंतर नवऱ्याला कळवण्यात आलं. माहिती मिळताच पती शमशेर कुटुंबासह मुगलसराय कोतवाली येथे पोहोचला. तिथे पंचायत चालली. विवाहिता प्रियकरासोबत राहण्यासाठी हट्टाला पेटली.
विवाहितेचा प्रियकर तिच्याच वस्तीत राहतो
त्यानंतर पती शमशेर मीडियाशी बोलताना म्हणाला की, ‘मला ड्रममध्ये पॅक होऊन मरायचं नाही. ना दरीत उडी मारुन जीव द्यायचा आहे’ तो म्हणाला की, मी खुशीला माझ्यासोबत ठेवणार नाही. सहमती झाल्यानंतर पोलिसांनी तिला प्रियकरासोबत जाऊ दिलं. विवाहितेचा प्रियकर तिच्याच वस्तीत राहतो.
सोनूकडे सुपूर्द केलं
सीओ राजीव सिसोदिया यांनी सांगितलं की, पोलीस ठाण्यात बराच वेळ पंचायत चालली. तिघांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत. नवविवाहिता खुशीला आपल्या प्रियकरासोबत जायचं होतं. तिन्ही कुटुंबांच एकमत झाल्यानंतर खुशीला तिचा प्रियकर सोनूकडे सुपूर्द करण्यात आलं.
