संतापजनक! तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, मृतदेह रजईखाली लपवून पळ काढला

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथे आजोळी राहणाऱ्या 3 वर्षांच्या एका निष्पाप मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची संपातजनक घटना घडली आहे. जेव्हा कुटुंबातील सदस्य देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी गेले होते तेव्हा नराधमाने हा गुन्हा केलाय. या प्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

संतापजनक! तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, मृतदेह रजईखाली लपवून पळ काढला
अवघ्या 17 दिवसांपूर्वीच लग्न, डोळ्यात संसाराची स्वप्न अन् संशयास्पद मृत्यू

फतेहपूर : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथे आजोळी राहणाऱ्या 3 वर्षांच्या एका निष्पाप मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची संपातजनक घटना घडली आहे. जेव्हा कुटुंबातील सदस्य देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी गेले होते तेव्हा नराधमाने हा गुन्हा केलाय. या प्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

घरात कुणी नसल्याचं पाहून शेजारच्या तरुणाने त्या निष्पाप मुलीला फूस लावली आणि तिला आपल्यासोबत खोलीत घेऊन गेला आणि बलात्कार केल्यानंतर तिचा खून केला, तसेच तिचा मृतदेह लपवून ठेवला, असा आरोप आहे. मूर्ती विसर्जन करुन परतलेल्या कुटुंबातील सदस्यांना घरात मुलगी सापडली नाही, तेव्हा तिची शोधा शोध करण्यात आला.

मुलीच्या आईने शेजाऱ्याच्या दिनेश पासवानला संशयाच्या आधारावर मुलीबद्दल विचारले असता तो घाबरला आणि मुलीची माहिती नाकारुन निघून गेला. त्याच्या कृत्यामुळे त्याच्यावर कुटुंबाचा संशय बळावला. कुटुंबियांनी शेजाऱ्यांसह दिनेश पासवान यांच्या खोलीचा शोध घेतला असता मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रजईखाली दबलेला आढळला, त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची चौकशी केल्यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. ही घटना फतेहपूर जिल्ह्यातील खागा कोतवाली भागातील आहे. एएसपी राजेश कुमार यांनी सांगितले की, निष्पाप मुलीवर बलात्कार केल्यानंतर खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी दिनेश पासवानला अटक करण्यात आली आहे. फिल्ड युनिटने घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले आहेत. पुराव्यांच्या आधारे आवश्यक ती कारवाई केली जात आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई पोलीस कर्मचाऱ्याकडून कोल्हापुरात बलात्कार, अल्पवयीन मुलगी गरोदर

अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार, पीडिता गरोदर, कोर्टाकडून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI