अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार, पीडिता गरोदर, कोर्टाकडून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये दोन वर्षांपूर्वी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली होती. आरोपीने पीडितेवर सलग सहा ते सात महिने अत्याचार केला. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर संबंधित संतापजनक घटना समोर आली होती. याप्रकरणी कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे.

अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार, पीडिता गरोदर, कोर्टाकडून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
प्रातिनिधीक फोटो

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये दोन वर्षांपूर्वी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली होती. आरोपीने पीडितेवर सलग सहा ते सात महिने अत्याचार केला. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर संबंधित संतापजनक घटना समोर आली. आरोपी पीडितेला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणी कोर्टात खटला सुरु होता. अखेर कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच कोर्टाने आरोपीला 1 लाख 5 हजारांचा दंड ठोठावला आहे. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखी 6 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही सोनभद्रच्या शक्तिनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली होती. पीडितेच्या आईने 1 ऑक्टोबर 2019 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. आरोपीचं नाव दीपक भारती असं आहे. दीपक भारती हा आपल्या मुलीवर गेल्या सहा ते सात महिन्यांपासून जीने मारण्याची धमकी देऊन अत्याचार करत होता. त्याच्या या कुकृत्यांमुळे इयत्ता आठवीत शिकणारी पीडिता गरोदर झाली, अशी तक्रार पीडितेच्या आईन पोलिसात केली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

पोलिसांना तपास करत असताना आरोपी विरोधात काही पुरावे मिळाले. याच पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी कोर्टात चार्जशीट दाखल केली. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आज निकाल सुनावला.

कोर्टाने नेमका निकाल काय सुनावला?

“कोर्टाने दोन्ही पक्षाच्या वकिलांचे ठराविक मुद्दे मांडत आरोपी दीपक भारतीला दोषी ठरवले. तसेच आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय कोर्टाने आरोपीला 1 लाख 5 हजारांचा दंड सुनावला. तसेच आरोपीने आर्थिक दंड न दिल्यास त्याला अतिरिक्त सहा महिन्यांची कारावासांची शिक्षा आणखी भोगावी लागेल, असंही कोर्टाने नमूद केलं. तसेच दंडाची जी रक्कम आहे ती संपूर्ण रक्कम पीडितेला देण्यात येईल”, असा निकाल कोर्टाने सुनावला.

महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या

देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत बलात्काराची भयानक घटना समोर आली होती. या घटेनेने दिल्लीत घडलेल्या महाभयंकर निर्भया हत्याकांडाची आठवण करुन दिली होती. त्यापाठोपाठ डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर 30 पेक्षा जास्त जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याशिवाय देशभरात बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत.

हेही वाचा :

प्रेयसीच्या आत्महत्येने संताप, प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाची प्रियकराकडून हत्या

चोरट्याला धडा शिकवण्यासाठी तो धावला पण त्रिपाठीनं डाव साधला, वसईतल्या हत्येचा थरार CCTV मध्ये कैद

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI