Video: चोरट्याला धडा शिकवण्यासाठी तो धावला पण त्रिपाठीनं डाव साधला, वसईतल्या हत्येचा थरार CCTV मध्ये कैद

विरारमध्ये पर्स घेऊन पळणाऱ्या एका चोरट्याने प्रवाशावर धारदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात हा प्रवाशी ठार झाला. (Man stabbed to death by thief at Virar railway station)

Video: चोरट्याला धडा शिकवण्यासाठी तो धावला पण त्रिपाठीनं डाव साधला, वसईतल्या हत्येचा थरार CCTV मध्ये कैद
पत्नी व मुलाची हत्या करुन पतीची आत्महत्या
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 7:04 PM

विरार: विरारमध्ये पर्स घेऊन पळणाऱ्या एका चोरट्याने प्रवाशावर धारदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात हा प्रवाशी ठार झाला. लोकांसमोरच या चोरट्याने हत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

विरारमध्ये सराईत चोरट्याने एका प्रवाशावर चाकूने वार करून प्रवाशाची हत्या केली आहे. विरार पश्चिम रेल्वे स्टेशन जवळील श्रेया हॉटेलच्या बाजूच्या बोळीत रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. हर्षल वैद्य असे या चोरट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर हल्लेखोर चोरट्याचे नाव प्रदीप त्रिपाठी असे आहे. प्रवाशाची पर्स हिसकावून चोरटा पळ काढत असताना त्याचा पाठलाग करून पकडले असता चोरट्याने प्रवाशावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या केली.

नागरिकांचा बेदम मारहाण

हा सर्व थरार श्रेया हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा चोरटा एका कोपऱ्यात उभं राहून चाकूने वार करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तसेच चोरट्याला पकडण्यासाठी पुढे सरसावलेल्या नागरिकांनाही तो चाकूचा धाक दाखवताना दिसत आहे. मात्र, नागरिकांनी जीवावर उदार होऊन मोठ्या शिताफीने या चोरट्याला पकडून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

उल्हासनगरात दिराची वहिनीला मारहाण

दुसरीकडे उल्हासनगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हातगाडीची पालिकेत तक्रार केल्याच्या संशयावरुन दिराने आपल्या वहिनीला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडलीये. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदूमल रहेजा याची हातगाडी आहे. उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं बुधवारी अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई सुरू असताना चंदूमल याच्याही हातगाडीवर कारवाई करण्यात आली. या हातगाडीजवळच चंदूमल याची वहिनी अंजली रहेजा यांचं दुकान आहे. त्यामुळे अंजली यांनीच आपल्या हातगाडीची तक्रार पालिकेत केल्याचा संशय चंदूमल याला आला.

याच संशयातून चंदूंमल आणि अंजली यांच्यात वाद झाला. यावेळी चंदूमला आणि त्याचा मुलगा दिनेश या दोघांनी मिळून अंजली रहेजा यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर अंजली यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून अंजली यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत उल्हासनगर पोलिसांनी चंदूमल रहेजा आणि दिनेश रहेजा या दोघांना अटक केली आहे.

संबंधित बातम्या:

Aryan Khan Bail | आर्यन खानचा मुक्काम कोठडीतच ! न्यायालयाने निकाल राखून ठेवला, 20 ऑक्टोबरला निर्णय

वर्चस्वाच्या वादातून यवतमाळमध्ये मोठा घातपात, दोघांची हत्या, सहा आरोपींना बेड्या

पोटच्या मुलाने पित्याच्या डोक्यात पार घातली, रक्तबंबाळ पित्याचा तडफडून मृत्यू, सांगलीतील वेदनादायी घटना

(Man stabbed to death by thief at Virar railway station)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.