प्रेयसीच्या आत्महत्येने संताप, प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाची प्रियकराकडून हत्या

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील किशनपूर पोलीस स्टेशन परिसरातील रारी गावाच्या जंगलात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्राने गळा कापून तरुणाचा खून करण्यात आला होता

प्रेयसीच्या आत्महत्येने संताप, प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाची प्रियकराकडून हत्या
प्रातिनिधीक फोटो

लखनौ : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील मोहित तिवारी हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त प्रियकराने त्याच्या मित्रासह मोहित तिवारीचा कुऱ्हाडीने गळा चिरुन खून केला होता. पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कल्लू पासवान आणि त्याचा साथीदार अनिल यादव यांना अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

काय आहे प्रकरण?

11 ऑक्टोबर रोजी सकाळी उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील किशनपूर पोलीस स्टेशन परिसरातील रारी गावाच्या जंगलात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्राने गळा कापून तरुणाचा खून करण्यात आला होता. मृतदेह त्याच गावातील गोलू उर्फ ​​मोहित तिवारी याचा असल्याचं समोर आलं होतं.

आरोपीच्या मैत्रिणीची आत्महत्या

मुख्य आरोपी कल्लू याने पोलिसांना सांगितले की, तो गावातील एका मुलीवर प्रेम करत होता आणि त्याला पळून जाऊन तिच्याशी लग्न करायचे होते. त्याच वेळी ती मुलगी मोहितच्या संपर्कात आली आणि मोहितने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्यामुळे ती मुलगी माझ्यापासून अंतर राखून राहत होती. मुलीवरुन माझे मोहितशी खटके उडू लागले, तेव्हा ही गोष्ट गावात चर्चेचा विषय झाली. या चर्चांच्या भीतीमुळे मुलीने आत्महत्या केली.

कुऱ्हाडीने गळा कापून खून

कल्लूने सांगितले की, मी मोहितचा मित्र अनिल यादव याला बोलावून सूड भावनेने मोहितची हत्या करण्याचा कट रचला. गावाबाहेर दारु पिण्याच्या बहाण्याने बोलावून मोहितची कुऱ्हाडीने गळा कापून त्याचा खून केला. पोलिसांनी खुनामध्ये वापरलेली कुऱ्हाड आणि मृत मोहित तिवारीचा मोबाईलही जप्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ही घटना किशनपूर पोलीस स्टेशन परिसरातील रारी गावातील आहे.

संबंधित बातम्या :

बायकोला छळण्यासाठी नवऱ्याने ‘आत्महत्ये’चा बनावट व्हिडीओ पाठवला, पोलिसांनी बनाव कसा उघड केला?

दोन दिवसांपासून बेपत्ता, शेतातल्या विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह, आत्महत्या की घातपात? पोलिसांपुढे मोठं आव्हान

पाकीट पळवणाऱ्या चोरट्याचा पाठलाग महागात, विरारमध्ये 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI