बायकोला छळण्यासाठी नवऱ्याने ‘आत्महत्ये’चा बनावट व्हिडीओ पाठवला, पोलिसांनी बनाव कसा उघड केला?

तरुणाच्या सासरच्या माणसांनी जावयाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली आणि त्यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले, तेव्हा त्याचे कुभांड उघडे पडले

बायकोला छळण्यासाठी नवऱ्याने 'आत्महत्ये'चा बनावट व्हिडीओ पाठवला, पोलिसांनी बनाव कसा उघड केला?
प्रातिनिधीक छायाचित्र

लखनौ – पती-पत्नीच्या भांडणात एका जोडीदाराने आत्महत्या केल्याच्या घटना अनेक वेळा उघडकीस येतात, पण कानपूरमध्ये पतीने पत्नीला छळण्याचा नवा मार्ग शोधला. त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना त्रास देण्यासाठी आपल्या मृत्यूचे खोटे नाटक रचले आणि मृत्यूचा बनावट व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र त्याचा बनाव उघडकीस आला.

काय आहे प्रकरण?

तरुणाच्या सासरच्या माणसांनी जावयाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली आणि त्यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले, तेव्हा त्याचे कुभांड उघडे पडले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृत्यूचे नाटक करणाऱ्या पतीचे आणि त्याचा बनावट व्हिडीओ तयार करणाऱ्या मित्राचे कृत्य उघड झाले. पोलीस आता दोघांना अटक करून अधिक तपास करत आहेत.

मेहुण्याला व्हिडीओ पाठवला

कानपूरच्या नवाबगंजमध्ये राहणाऱ्या छेडीलालने स्वतःच्या मृत्यूचे नाटक करण्यासाठी एक नाट्यमय प्रसंग रचला. छेडीलालचे सासर उन्नावमध्ये आहेत. त्याने आपल्या सासरच्या मंडळींशी वाद घातला आणि मेहुणा कुंदनला धमकी दिली की तो आत्महत्या करणार आहे. काही तासांनंतर त्याने त्याच्या मेहुण्याच्या मोबाईलवर स्वतःच्या मृत्यूचा व्हिडीओ पाठवला.

आरोपी जावयासह मित्राला अटक

हा व्हिडीओ त्याने आपला मित्र कालीचरणच्या मदतीने तयार केला होता, ज्यामध्ये त्याने आत्महत्या करण्याचे नाटक केले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी छेडीलाल आणि त्याचा मित्र कालीचरण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

डीसीपी पश्चिम बीबीजीटी एस मूर्ती म्हणाले की, कंट्रोल रुमला एका तरुणाच्या आत्महत्येची माहिती मिळाली होती, पोलिसांनी तपास केला तेव्हा युवक आणि त्याच्या मित्राचे हे बनावट कृत्य केल्याचे समोर आले, त्यानंतर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

मुलगा मेला, मुलगी गळफास घेतेय, लवकर मुंबईला ये, बायकोला माहेरुन बोलवण्यासाठी मुलांच्या मृत्यूचा बनाव

वेडा म्हणून वारंवार चिडवल्याने तरुणाची काठीने मारहाण, सात जणांकडून तरुणाचीच हत्या

अभ्यासावरुन रागावणाऱ्या आईची मुलीकडून हत्या, आत्महत्या केल्याचा बनाव

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI