मुलगा मेला, मुलगी गळफास घेतेय, लवकर मुंबईला ये, बायकोला माहेरुन बोलवण्यासाठी मुलांच्या मृत्यूचा बनाव

आरोपीने त्याच्या तेरा वर्षांच्या मुलीला प्लास्टिकच्या बालदीवर उभे करत तिच्या गळ्यात ओढणीने फास टाकला आणि पंख्याला लटकवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे

मुलगा मेला, मुलगी गळफास घेतेय, लवकर मुंबईला ये, बायकोला माहेरुन बोलवण्यासाठी मुलांच्या मृत्यूचा बनाव
पत्नीला घरी बोलवण्यासाठी मुलांच्या मृत्यूचा बनाव
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 11:54 AM

मुंबई : पत्नी माहेरी निघून गेली आणि वारंवार विनवण्या करुनही घरी परत येत नाही, म्हणून पतीने क्रौर्याची परिसीमा गाठली. आरोपी बापाने स्वत:च्या मुलीला फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला. मुलगा मेला आणि मुलगी गळफास घेतेय लवकर मुंबईत परत ये, अशी धमकी त्याने पत्नीला दिली होती. मुंबईतील मालाडच्या कुरार परिसरात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अजय गौड याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या तावडीतून दोन्ही मुलांची सुटका केली.

काय आहे प्रकरण?

अजय गौड याला नशा करण्याचे व्यसन आहे. त्यातच तो पत्नी आणि दोन मुलांना बेदम मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी दोन्ही मुलांना घेऊन उत्तर प्रदेश येथील गावी निघून गेली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी तेरा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा यांना घेऊन अजय मुंबईत परतला होता. त्यानंतर नशेत पुन्हा त्याने मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

पंख्याला लटकवून जीवे मारण्याचा प्रयत्न

गौड याचा भाऊ सूचित याने कुरार पोलिसांना तक्रार दिली होती. अजयने त्याच्या तेरा वर्षांच्या मुलीला प्लास्टिकच्या बालदीवर उभे करत तिच्या गळ्यात ओढणीने फास टाकत पंख्याला लटकवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुलीला तो पाया खालील बादली हटवण्यास सांगत होता. तसं करण्यास तिने नकार दिल्यावर त्याने पंखा सुरू करण्याची धमकी दिली आणि मुलगी घाबरून ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरी धाव घेत अजयला अडवले.

“मुलगा मेला आणि मुलगी गळफास घेतेय”

कुरार पोलिसांनी अजय गौड याच्या ताब्यातून दोन मुलांची सुटका केली आणि अजयला अटक केली, अशी माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांनी दिली. अजय गौड याने मुलालाही जमिनीवर झोपवून त्याच्या अंगावर सफेद चादर टाकत दोन्ही मुलांचे फोटो काढले व पत्नीला पाठवले. मुलगा मेला आणि मुलगी गळफास घेतेय लवकर मुंबईत परत ये, अशी धमकी त्याने पत्नीला दिली होती.

संबंधित बातम्या :

वेडा म्हणून वारंवार चिडवल्याने तरुणाची काठीने मारहाण, सात जणांकडून तरुणाचीच हत्या

अभ्यासावरुन रागावणाऱ्या आईची मुलीकडून हत्या, आत्महत्या केल्याचा बनाव

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.