VIDEO | वेडा म्हणून वारंवार चिडवल्याने तरुणाची काठीने मारहाण, सात जणांकडून तरुणाचीच हत्या

मनोज राजू कजबे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तू वेडा आहेस, असं त्याला वारंवार चिडवलं जायचं. याच रागातून मनोजने चिडवणाऱ्या टोळक्याला काठीने मारहाण केल्याचा दावा केला जातो.

VIDEO | वेडा म्हणून वारंवार चिडवल्याने तरुणाची काठीने मारहाण, सात जणांकडून तरुणाचीच हत्या
पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाची हत्या


पिंपरी चिंचवड : पिंपरीमधील डिलक्स चौकात टोळक्याकडून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तू वेडा आहेस, असं वारंवार चिडवल्यामुळे तरुणाने काठीने मारहाण केली होती. या कारणावरुन टोळक्याने बेदम मारहाण करुन त्या तरुणाचाच जीव घेतला.

नेमकं काय घडलं?

मनोज राजू कजबे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तू वेडा आहेस, असं त्याला वारंवार चिडवलं जायचं. याच रागातून मनोजने चिडवणाऱ्या टोळक्याला काठीने मारहाण केल्याचा दावा केला जातो. या कारणावरुन टोळक्याने मनोजला बेदम मारहाण केली. मात्र मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

पिंपरीमधील डिलक्स चौकात हा धक्कादायक प्रकार घडला. पिंपरी पोलीस ठाण्यात सात आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामधील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांची चिंताही वाढवणारी आहे. जानेवारी ते जून 2021 या कालावधीत पुण्यात हत्येच्या प्रयत्नाचे एकूण 139 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात हा आकडा 44 इतकाच होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या तब्बल 95 ने वाढली आहे. तर यावर्षी पहिल्या सहा महिन्यात 38 जणांच्या हत्या झाल्याचं समोर आलं आहे, गेल्या वर्षी हा आकडा 36 इतका होता.

संबंधित बातम्या :

पुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक

मायलेकाची हत्या करुन पतीची आत्महत्या? तपासाचे अनेक कंगोरे, पुण्यातील हत्याकांडाने पोलीसही चक्रावले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI