पुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक

माधव वाघाटे याच्या हत्येनंतर अंत्यविधीला बाईक रॅली काढून दहशत पसरवल्या प्रकरणी पोलिसांनी अनेक जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. परंतु 21 वर्षीय सिद्धार्थ पलंगे गेले दोन महिने फरार होता

पुण्यात गुंड माधव वाघाटेच्या अंत्यविधीला भव्य बाईक रॅली, 21 वर्षीय फरार आरोपीला अखेर अटक
माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेला भव्य बाईक रॅली
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 8:08 AM

पुणे : सराईत गुंड माधव वाघाटे याच्या हत्येनंतर अंत्यविधीत शेकडो बाईक्सची रॅली काढल्याप्रकरणी फरार आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. पुण्यात 21 वर्षीय गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली. आरोपी सिद्धार्थ संजय पलंगे गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. (Pune Bike rally at the funeral of Criminal Madhav Waghate Absconding Accuse Siddharth Palange arrested)

माधव वाघाटे याच्या हत्येनंतर अंत्यविधीला बाईक रॅली काढून दहशत पसरवल्या प्रकरणी पोलिसांनी अनेक जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. परंतु गुलमोहर सोसायटी, बालाजीनगर भागात राहणारा 21 वर्षीय सिद्धार्थ पलंगे गेले दोन महिने फरार होता. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. पलंगे याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, मारामारी असे तीन गुन्हे सहकारनगर, दत्तवाडी, बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

काय घडलं होतं?

माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी पुण्यात 125 बाईक्सची रॅली काढण्यात आली होती. यावेळी कोरोना संबंधी नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले होते. यासंबंधी वृत्त प्रसारित झाल्यानंतर आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत बाईक रॅली काढणाऱ्या जवळपास शंभर जणांना ताब्यात घेतले होते. तर त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या होत्या.

सराईत गुन्हेगाराची हत्या

पुण्यातील माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराची 15 मे रोजी हत्या झाली होती. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याने वादानंतर टोळक्यानं बिबवेवाडी इथं सरोजिनी क्लिनिकसमोर माधव वाघाटे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत बाईक रॅली

माधव वाघाटेवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत 125 दुचाकींची रॅली काढण्यात आली होती. या प्रकरणी 150 ते 200 जणांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनिल खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषिकेश भगत, गणेश फाळके अशा वाघाटेच्या साथीदारांचा समावेश आहे.

कोण होता माधव वाघाटे?

माधव वाघाटे हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरवरील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आलं होतं.

पुणेकरांचा संताप

पुण्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर आणि पोलिसांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिवाचं रान केलं जात आहे. अशातच सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 बाईकची रॅली काढल्याचं समोर आल्याने संताप व्यक्त केला जात होता.

पोलिसांची बदली

अंत्ययात्रेतील भव्य बाईक रॅलीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकाराची पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गंभीर दखल घेतली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे यांची आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर गुन्हे निरीक्षक राजेंद्रकुमार कदम यांची गुन्हे शाखेत ट्रान्सफर करण्यात आली आहे. तर सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांची सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली, कोरोना काळात पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यात गुन्हेगाराची हत्या, अंत्ययात्रेला शेकडो बाईक्सची रॅली, 80 समर्थक ताब्यात

(Pune Bike rally at the funeral of Criminal Madhav Waghate Absconding Accuse Siddharth Palange arrested)

Non Stop LIVE Update
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.