पाकीट पळवणाऱ्या चोरट्याचा पाठलाग महागात, विरारमध्ये 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

हर्षलने चोरट्याचा पाठलाग करुन विरार पश्चिम स्टेशन जवळील श्रेया हॉटेलच्या गल्लीत त्याला पकडले. यावेळी चोर आणि हर्षल वैद्य यांच्यात झटापट झाली. याच झटापटीत चोरट्याने आपल्याजवळील धारदार हत्याराने हर्षलच्या छातीत वार केले.

पाकीट पळवणाऱ्या चोरट्याचा पाठलाग महागात, विरारमध्ये 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या
विरारमध्ये तरुणाची हत्या

विरार : विरारमध्ये चोरट्याने 30 वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने वार करून हत्या केली. पाकीट हिसकावून पळणाऱ्या चोराचा पाठलाग करुन पकडले असता चोरट्याने त्याच्यावर वार केले. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत विरार पोलीस ठाण्यात जबरी चोरी, हत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. हत्या करणारा चोरटा हा सराईत असून त्याच्यावर रेल्वेत चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

नेमकं काय घडलं

30 वर्षीय हर्षल वैद्य विलेपार्ले भागात राहणारा असून नवरात्री निमित्त तो विरारमध्ये आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास तो परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेला, तेव्हा एका सराईत चोरट्याने त्याचं पाकीट हिसकावून पळ काढला.

धारदार हत्याराने हर्षलच्या छातीत वार

हर्षलने चोरट्याचा पाठलाग करुन विरार पश्चिम स्टेशन जवळील श्रेया हॉटेलच्या गल्लीत त्याला पकडले. यावेळी चोर आणि हर्षल वैद्य यांच्यात झटापट झाली. याच झटापटीत चोरट्याने आपल्याजवळील धारदार हत्याराने हर्षलच्या छातीत वार केले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, चोराला अटक

आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी तात्काळ त्याला बाजूच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले, तर चोरट्यालाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विरार पोलिसांनी यात हत्या, जबरी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या :

दोन दिवसांपासून बेपत्ता, शेतातल्या विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह, आत्महत्या की घातपात? पोलिसांपुढे मोठं आव्हान

बायकोला छळण्यासाठी नवऱ्याने ‘आत्महत्ये’चा बनावट व्हिडीओ पाठवला, पोलिसांनी बनाव कसा उघड केला?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI