सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नबद्ध, वर्षभरातच दाम्पत्याचा गूढ मृत्यू, रात्री IPL पाहून झोपले, सकाळी मृतावस्थेत

सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नबद्ध, वर्षभरातच दाम्पत्याचा गूढ मृत्यू, रात्री IPL पाहून झोपले, सकाळी मृतावस्थेत
कानपूरमध्ये दाम्पत्याची हत्या
Image Credit source: आज तक

भाड्याच्या घरात राहणाऱ्या शिवम आणि ज्युली यांचं लग्न एक वर्षापूर्वी सामूहिक विवाह सोहळ्यात झालं होतं. शिवम चाटचा गाडा टाकून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. रात्री उशिरा दोघेही खोलीत झोपले होते, मात्र सकाळी दोघांचे मृतदेह खोलीतच आढळून आले.

अनिश बेंद्रे

|

May 19, 2022 | 2:07 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये (Uttar Pradesh Crime News) वर्षभरापूर्वी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेल्या पती-पत्नीची राहत्या घरातच निर्घृण हत्या (Couple Murder) करण्यात आली. घरात कुठल्याही प्रकारची लुटालूट झालेली नाही. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून त्यांची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बजरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे (Kanpur Double Murder) एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा आयपीएल सामना पाहून दोघेही पती-पत्नी झोपले होते आणि सकाळी दोघांचे मृतदेह खोलीत आढळले.

काय आहे प्रकरण?

भाड्याच्या घरात राहणाऱ्या शिवम आणि ज्युली यांचं लग्न एक वर्षापूर्वी सामूहिक विवाह सोहळ्यात झालं होतं. शिवम चाटचा गाडा टाकून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. रात्री उशिरा दोघेही खोलीत झोपले होते, मात्र सकाळी दोघांचे मृतदेह खोलीतच आढळून आले. ज्युलीचे वडील घरी पोहोचल्यावर ही घटना उघडकीस आली.

सासऱ्यांनी पाहिले मुलगी-जावयाचे मृतदेह

मुलगी आणि जावयाचा मृतदेह पडलेला पाहून सासऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त विजय मीणा यांच्यासह अनेक पोलीस ठाण्यांचे फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी सर्व पुरावे गोळा केल्यानंतर पथकाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

आयपीएल सामने पाहून दाम्पत्य झोपलेले

घटनास्थळी पोहोचलेले पोलीस आयुक्त विजय मीना यांनी सांगितले की, रात्री उशिरा आयपीएल सामना पाहून दोघेही पती-पत्नी झोपले होते आणि सकाळी दोघांचे मृतदेह खोलीत आढळले. या घरात अनेक कुटुंबे भाड्याने एकत्र राहतात आणि जाण्यासाठी एकच रस्ता आहे. आतून कोणीतरी ही घटना घडवून आणली असावी, अशी भीती व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त विजय मीना यांनी सांगितले. घटनेचा उलगडा लवकरच होईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुहेरी हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें