एकत्र जीव देऊया, प्रेयसीला भुलवलं, विषारी गोळ्यांनी तरुणीचा मृत्यू, प्रियकर नामानिराळा

विद्यार्थिनीला चुकीच्या हेतूने हॉटेलमध्ये नेण्यात आले आणि नंतर कोल्ड ड्रिंकमध्ये सल्फासच्या गोळ्या मिसळून देण्यात आल्या. एसपींच्या म्हणण्यानुसार, आरोपी विद्यार्थी हा पीडिता आणि तिच्या कुटुंबाचा परिचित असल्याचे समोर आले.

एकत्र जीव देऊया, प्रेयसीला भुलवलं, विषारी गोळ्यांनी तरुणीचा मृत्यू, प्रियकर नामानिराळा
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 3:45 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात इयत्ता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करुन हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला. मयत विद्यार्थिनीचा मित्र सुरज याने आधी मंगल पांडे नगर येथील जलसा अतिथीगृहात तिच्यासोबत दुष्कृत्य केले. त्यानंतर तिला विष पाजून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरजला अटक केली आहे. रविवारी संध्याकाळी काही तरुणांनी तेजगढी चौकाचौकात मेणबत्ती मोर्चा काढून आरोपी प्रियकराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

मेरठचे एसपी विनीत भटनागर यांनी सांगितले की, दोन दिवसांत हे हत्याकांड उघडकीस आले आहे. त्याने सांगितले की, विद्यार्थिनीला चुकीच्या हेतूने हॉटेलमध्ये नेण्यात आले आणि नंतर कोल्ड ड्रिंकमध्ये सल्फासच्या गोळ्या मिसळून देण्यात आल्या. एसपींच्या म्हणण्यानुसार, आरोपी विद्यार्थी हा पीडिता आणि तिच्या कुटुंबाचा परिचित असल्याचे समोर आले.

चौकशी दरम्यान समोर आले आहे की मयत विद्यार्थिनी सुरजवर मनापासून प्रेम करत होती. ती रोज त्याच्याशी लग्नाबद्दल बोलायची. या कारणामुळे सुरज तिचा काटा काढण्याचा विचार करत होता. त्यामुळे सुरजने पंधरा दिवसांपूर्वी सल्फास विकत घेतल्या आणि नंतर मुलीला बोलावून, एकत्र जगण्या-मरण्याचे वचन देऊन, धान्यांजवळ ठेवलेल्या जाणाऱ्या विषारी सल्फास गोळ्या शीतपेयामध्ये मिसळून तिला दिले.

किडनी आणि फुफ्फुसे निकामी

विनीत भटनागर यांनी सांगितले की, 6 ऑक्टोबर रोजी विद्यार्थिनी तिच्या वडिलांसोबत परीक्षेसाठी गेली होती. पण चार तासांनी ती घरी परतली, तेव्हा तिची अवस्था खूपच वाईट होती. तिला प्रथम महिला डॉक्टरकडे आणि नंतर रुग्णालयात नेण्यात आले. पण तिची किडनी आणि फुफ्फुसे निकामी झाली. यामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपी सूरजला अटक करण्यात आली आहे.

मुलीचा लग्नासाठी तगादा

आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याचे तीन वर्षांपासून मुलीशी प्रेमसंबंध होते. ती लग्न करण्याचा हट्ट करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहिदपूर खारखोडा येथील रहिवासी सूरजने सांगितले की, घटनेपूर्वी विद्यार्थिनीची परीक्षा संपली होती.

विष पिण्याचं नाटक

बेगम पुलावर असलेल्या प्रसिद्ध शाळेजवळ विद्यार्थिनीसह टेम्पोने तो मोहनपुरीतील एका हॉटेलमध्ये पोहोचला. खोली क्रमांक 102 बुक केले होते. तिथे त्याने एकत्र विष प्राशन करुन एकत्र आय़ुष्याची अखेर करण्याचं नाटक केलं. मात्र चालाखीने त्याने तरुणीला विष दिले, पण स्वतः खाल्ले नाही.

संबंधित बातम्या :

खोलीत कोब्रा सोडून 25 वर्षीय पत्नीची हत्या, पती दोषी सिद्ध, शिक्षेकडे लक्ष

खोलीत साप सोडून सासूची हत्या, प्रियकराच्या साथीने सुनेचं षडयंत्र, सरन्यायाधीश म्हणाले, लायकी नाही तुमची…

सोन्याच्या दागिन्यांचा हव्यास, चुलत सासूची हत्या करुन सुनेने दागिने ओरबाडले, कानाचेही लचके

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.