AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Extramarital Affair : पुतण्याच्या प्रेमात पडली विधवा काकी, लव स्टोरीमध्ये असा टि्वस्ट आला की, दोघांनी एकत्र….

Extramarital Affair : पुतण्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न दुसरीकडे ठरवलं. याबद्दल काकीला समजल्यानंतर ती भरपूर रडली. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, असं तिने पुतण्याला सांगितलं. 32 वर्षीय विधवा महिला दोन मुलांसह सासरी रहायची.

Extramarital Affair : पुतण्याच्या प्रेमात पडली विधवा काकी, लव स्टोरीमध्ये असा टि्वस्ट आला की, दोघांनी एकत्र....
love affair
| Updated on: Jul 30, 2024 | 3:44 PM
Share

प्रेमाला वयाच बंधन नसतं असं म्हणतात. प्रेम कधीही, कुठेही, कोणावरही होऊ शकतं. असच एक प्रकरण समोर आलय. विधवा काकी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या पुतण्याच्या प्रेमात पडली. पदरात दोन मुलं असतानाही काकीने पुतण्यासोबत आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. दोघांमध्ये अफेयर सुरु असल्याच जसं पुतण्याच्या कुटुंबीयांना समजलं, त्यावरुन मोठा गदारोळ झाला. पुतण्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न दुसरीकडे ठरवलं. याबद्दल काकीला समजल्यानंतर ती भरपूर रडली. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, असं तिने पुतण्याला सांगितलं. उत्तर प्रदेशच्या गोंडामधील हे प्रकरण आहे.

पुतण्याचा सुद्धा काकीवर जीव जडलेला. त्याने सुद्धा घरच्यांना काकीवर भरपूर प्रेम असल्याच सांगितलं. माझं काकीवर प्रेम आहे. मी तिच्याशी लग्न करणार हे घरच्यांना निक्षून सांगितलं. कुटुंबीय ऐकले नाहीत, तेव्हा काकी आणि पुतण्याने टोकाच पाऊल उचललं. दोघांनी वेगात येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारुन जीवन संपवलं. हैराण करणारी बाब म्हणजे पदरात दोन मुलं आहेत, याचा सुद्धा त्या महिलेला विसर पडला. आपल्यानंतर त्या मुलांच काय होणार? हा विचारही केला नाही.

‘मुलांची सुद्धा परवा केली नाही’

हे प्रकरण गोंडा जिल्ह्यातील इटियाथोक भागातील आहे. 32 वर्षीय विधवा महिला दोन मुलांसह सासरी रहायची. पुतण्या रवींद्र कुमार सुद्धा सोबत रहायचा. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. महिलेला आठ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे. भाच्याच्या प्रेमात महिला इतकी आंधळी झालेली की, कुटुंब, समाजासह तिने आपल्या मुलांची सुद्धा परवा केली नाही.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.